वरवेली ग्रामपंचायतीच्या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक
गुहागर, ता.04 : तालुक्यातील वरवेली ग्रामपंचायतीच्या वतीने सुवासिनींसह विधवा महिलांना हळदीकुंकू कार्यक्रमात सहभागी करून त्यांचा सन्मान करण्यात आला. गावातील विधवा महिलांना समाजात सन्मानाने जगता यावे, यासाठी त्यांना ग्रामपंचायतीने सन्मानपूर्वक बोलावून हळदीकुंकू कार्यक्रमात सहभागी करून त्यांना सुहासिनीना देण्यात येणारे वाण देण्यात आले. Widow Honored in Haldikunku Program

वरवेली ग्रामपंचायतीने तालुक्यात अनिष्ट विधवा प्रथा बंद करण्याच्या क्रांतिकारी निर्णय घेतला होता. त्यानंतर प्रत्येक सार्वजनिक व घरगुती कार्यक्रमात विधवा महिलाना सन्मानाचे स्थान देण्यात येत होते. त्यानंतर विधवा महिलांनाही हळदी कुंकू कार्यक्रमाला सहभागी करून घेतल्यानंतर वरवेली ग्रामपंचायतीच्या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या कार्यक्रमाला गावातील सर्वच सुवासिनींसह विधवा महिला उपस्थित राहिल्या होत्या. Widow Honored in Haldikunku Program
वरवेली ग्रामपंचायतीच्या वतीने सुवासिनी महिलांबरोबर विधवा महिलांनाही सहभागी करून साजरा करण्यात आलेला हळदी कुंकू कार्यक्रमाची सुरुवात जिल्ह्यातून वरवेली ग्रामपंचायतीने केली आहे. या पुढील प्रत्येक हळदीकुंकू कार्यक्रमात विधवा महिलाना सन्मानाने सहभागी करून घेण्यात येणार असल्याची प्रतिज्ञा सर्व महिलांनी केली.

वरवेली ग्रामपंचायतीने हळदीकुंकू कार्यक्रमाचे सर्व महिलांना निमंत्रण देऊन सौभाग्यवती महिलांसोबत विधवा महिलांना सुद्धा आदराने हळदीकुंकूवाचे वाण व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. मानसन्मान दिल्याबद्दल विधवा महिलांनी सुद्धा ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांचे आभार मानले. Widow Honored in Haldikunku Program
या कार्यक्रमासाठी सरपंच पुनम रावणंग, उपसरपंच धनश्री चांदोरकर, ग्रा. प. सदस्या दिव्या किर्वे, लक्ष्मी विचारे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष अरुण आगरे, गणेश किर्वे, माजी सरपंच सुप्रिया देसाई, प्रतीक्षा किर्वे, राधा शिंदे, दिशा विचारे सर्व महिला वाडी अध्यक्ष उपस्थित होते. Widow Honored in Haldikunku Program
