गुहागर, ता. 02 : 1 नोव्हेंबर 2022 रोजी इंटेलिजेंस कोअरच्या 80 व्या कोअर दिनानिमित्त, लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग(Lt Gen Ajay Kumar Singh), एव्हीएसएम, वायएसएम, एसएम, व्हीएसएम, जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, दक्षिण कमांड यांनी इंटेलिजन्स कोअरच्या सर्व श्रेणींचे कौतुक केले. ‘सदासतर्क’ या ब्रीदवाक्यानुसार कठोर परिश्रम करत राहण्याचे आणि आपल्या निर्णय क्षमतेचा लाभ लष्करातील विविध टप्प्यांवर देण्याचे आवाहन केले. 80th Core Day of Intelligence Core


शांततेच्या काळात आणि युद्धादरम्यान देखील लष्कराची परिचालन कार्यक्षमता वाढविण्यासाठी योग्य वेळी, अचूक आणि कृतीयोग्य गुप्तचर (spy) माहिती प्रदान करणारी एक निर्णायक आणि महत्त्वपूर्ण शाखा म्हणून इंटेलिजेंस कोअरने (Intelligence Core) आपली ओळख निर्माण केली आहे. या कोअरने उच्च दर्जाची व्यावसायिकता जपली आहे तसेच विविध संघर्षाच्या प्रसंगी सतत बदलत्या परिस्थितीमुळे जलद गतीने निर्माण होणार्या अनेक आव्हानांना सामोरे जाण्याचा त्यांचा दृढनिश्चय आहे. भविष्यातील तांत्रिक अभिनवता, संघर्षाच्या अमर्यादित आणि अपारंपरिक शक्तींच्या वाढत्या वर्चस्वामुळे येणाऱ्या संभाव्य आव्हानांना तोंड देण्यासाठी इंटेलिजेंस कोअर सदैव सज्ज आहे. 80th Core Day of Intelligence Core


Tags – Lt Gen Ajay Kumar Singh, war, spy, Intelligence Core, गुहागर मराठी बातम्या, Updates of Guhagar, Latest News on Guhagar, Guhagar News in Marathi, Guhagar News, Marathi News, मराठी बातम्या, News in Guhagar, ताज्या बातम्या, लोकल न्युज, Guhagar, टॉप न्युज, Latest News, Latest Marathi News,