क्षत्रिय मराठा उत्कर्ष मंडळ, मुंबई वरवेली यांच्या मागणीला यश
गुहागर, ता. 01 : तालुक्यातील वरवेली येथील वरवेली फाटा ते वरवेली ग्रामपंचायत या मार्गावर कोणतीही वीजेची व्यवस्था नव्हती. वीजेची व्यवस्था नसल्याने या मार्गावरून प्रवास करताना नागरिकांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत होते. सदरची कैफियत क्षञिय मराठा उत्कर्ष मंडळ, मुंबई वरवेली यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्याकडे मांडून सौर दिव्यांची मागणी केली होती. नागरिकांच्या मागणीची पूर्तता माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी केली असून त्यांच्या प्रयत्नातून ४ सौर दिवे लावण्यात आले आहेत. Vikrant Jadhav gave Solar Lights for Varveli

या सौर दिव्यांसाठी गावातील शिवसेनेचे युवा कार्यकर्ता प्रशांत विचारे यांनी सतत पाठपुरावा केला होता. क्षञिय मराठा उत्कर्ष मंडळ, मुंबई वरवेली यांच्या वतीने माजी जिल्हापरिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांना उपरोक्त मंडळाच्या वतीने वरवेली फाटा ते ग्रामपंचायत या दरम्यान स्ट्रीट लाईटसाठी पञ दिलेले होते. नागरिकांच्या विनंती अर्जास मान देऊन ४ सौर दिवे लावण्यात आले. नागरिकांच्या मागणीची पूर्तता केल्याबद्दल माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांचे क्षञिय मराठा उत्कर्ष मंडळ, मुंबई वरवेलीचे अध्यक्ष अशोक मोहिते, सरचिटणीस सुहास नारायण विचारे, कार्याध्यक्ष संदिप विचारे व सर्व गावातील नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत. Vikrant Jadhav gave Solar Lights for Varveli

