• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरीत कार्तिकी एकादशीचा उत्सव

by Guhagar News
November 1, 2022
in Ratnagiri
21 0
0
Kartiki Ekadashi celebration in Ratnagiri
42
SHARES
119
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता.01 : प्रतिवर्षाप्रमाणे कार्तिकी एकादशी महोत्सव यंदा जल्लोषात साजरा होणार आहे.  उत्सव  ४ नोव्हेंबर एकादशीपासून चालू होणार असून १० नोव्हेंबरला सांगता होणार आहे. या  उत्सवानिमित्त बाजारपेठ परिसरातील प्राचीन विठ्ठल मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिवर्षाप्रमाणे ज्या भजन मंडळांना भजनसेवा करायची आहे. त्या मंडळांनी राजन फाळके यांच्याकडे २ नोव्हेंबरपर्यंत नावे नोंदवावीत, असे आवाहन विठ्ठल मंदिर देवस्थानतर्फे केले आहे. त्यानुसार वेळापत्रक बनवण्यात येणार आहे. Kartiki Ekadashi celebration in Ratnagiri

या एकादशीला ३ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीनंतर १.३० वाजता विठ्ठल-रुक्मिणीची पंचसूक्त पवमानयुक्त महापूजा होणार आहे. यंदा या महापूजेचा मान संकेत मयेकर यांना मिळाला आहे. पूजेनंतर ६ वाजता काकडा आरती होईल. त्यानंतर सकाळी ७ वाजल्यापासून दिवसभर विविध भजन मंडळे भजनाचा कार्यक्रम सादर करण्यात येतील. एकादशीला सकाळी ११ च्या दरम्यान कै. दाजिबा नाचणकर यांनी सुरू केलेली पायी दिंडी भार्गवराम मंदिर ते विठ्ठल मंदिरापर्यंत काढण्यात येणार आहे. या दिंडीला अनेक वर्षांची परंपरा असून पारंपरिक वेशभूषेमध्ये टाळ-मृदंगांच्या गजरात, विठुरायाचे भजन म्हणत शेकडो वारकरी यात सहभागी होणार आहेत. Kartiki Ekadashi celebration in Ratnagiri

विठ्ठल मंदिरातून रात्री ११.३० वाजता विठुरायाचा रथोत्सव सुरू होईल. रथोत्सवाची पारंपरिक सवाद्य मिरवणूक चालू होईल व शुक्रवारी ५ नोव्हेंबरला पहाटे ५ वाजता श्री हरीहरेश्वर भेट खालची आळी येथील श्री तृणबिंदूकेश्वर मंदिरात होईल. त्यानंतर सकाळी ६ वाजता काकडा आरती, कापूर आरती होईल. ८ नोव्हेंबरला विठ्ठल मंदिरात कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी ६ वाजल्यापासून त्रिपूर पाजळले जातील. कार्तिक वद्य २ म्हणजे १० नोव्हेंबरला पहाटे ६ वाजता काकडा आरती, कापूर आरती होईल. सकाळी ९ वाजता मंदिरात भोवत्या, दिंडी होऊन कार्तिकोत्सवाची सांगता होणार आहे. Kartiki Ekadashi celebration in Ratnagiri

६ नोव्हेंबरला विठुरायाची नगरप्रदक्षिणा

विठुरायाची नगरप्रदक्षिणा कार्तिक शुद्ध १३ शके १९४४ म्हणजे रविवार ६ नोव्हेंबरला दुपारी १ वाजता नगर प्रदक्षिणा काढण्यात येईल. ही प्रदक्षिणा रात्री १० वाजता मंदिरात परतेल. गोखले नाका, राधाकृष्ण नाका मार्गे धनजी नाका, गवळीवाडा, काशिविश्वेश्वर मंदिर, खडपे वठार, चवंडे वठार, मांडवी नाका, नाईक फॅक्टरीच्या लगतच्या रस्त्याने समुद्रावर नेण्यात येते. नंतर पालखीतील विठुरायाला समुद्रस्नान घडवले जाते. पेठकिल्ला, मुरुगवाडा, पांढऱा समुद्र, परटवणे नाका, भार्गवराम मंदिर, सावंतनगर, खालचा फगरवठार, परटवणे, वरचा फगरवठार, डीएसपी बंगला, चावडीवरून धनजी नाका, ,राधाकृष्ण नाका मार्गे विठ्ठल मंदिरात येणार आहे. Kartiki Ekadashi celebration in Ratnagiri

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiKartiki Ekadashi celebration in RatnagiriLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share17SendTweet11
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.