• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

दिवाळीतील किल्ले पाहण्यासाठी सायकल फेरी

by Mayuresh Patnakar
November 1, 2022
in Ratnagiri
19 0
0
Cycle tour to see forts in Diwali
37
SHARES
107
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 01 : आपल्या महाराष्ट्रातील गड किल्ले यांना फार प्राचीन काळापासून अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवाळीतील किल्ले बनवण्याची परंपरा ही आपल्या पूर्वजांनी आपला गौरवशाली इतिहास लहान मुलांनी अभ्यासावा याकरता निर्माण केलेली एक संधी आहे. दापोलीमध्येही चिमुकल्यांसह तरुणांनी विविध किल्ले साकारले आहेत. हे किल्ले पाहण्यासाठी रविवार ३० ऑक्टोबर २०२२ रोजी दापोली सायकलिंग क्लब तर्फे सायकल फेरी काढण्यात आली. तसेच ६ नोव्हेंबर २०२२ रोजी दापोली विंटर सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याची नोंदणी लवकरात लवकर करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. Cycle tour to see forts in Diwali

Cycle tour to see forts in Diwali

आझाद मैदानातून सुरु झालेली सायकल फेरी केळस्कर नाका- गाडीतळ- प्रभूआळी- झरीआळी- फॅमिली माळ- नर्सरी रोड- पांगारवाडी- आनंदनगर- लष्करवाडी- उदयनगर- लालबाग- आझाद मैदान अशा १० किमीच्या मार्गावर झाली. यामध्ये सर्व वयोगटातील नागरिक सायकल चालवत सहभागी झाले होते. या सायकल फेरी मार्गावरील किल्ल्यांना भेट देऊन ते बनवणाऱ्यांचे कौतुक करण्यात आले. दिवाळीमध्ये दगड मातीपासून किल्ले बनवण्याची मजा काही वेगळीच असते. सुराज्य मित्र मंडळ यांनी साकारलेला भव्य प्रतापगड, प्रभुआळी येथील कदम, ध्रुव किरडावकर व मित्रांनी बनवलेला लोहगड, लालबाग येथील राळे, पाटील यांचा भव्य राजगड, आग्रे, गोवले यांचे किल्ले, पांगारवाडी मधील शिगवण, कदम, आनंदनगरमधील गावडे, लष्करवाडीमधील जाधव, सम्यक पाते यांच्या येथील जंजिरा किल्ला पाहण्यासारखे आहेत. तसेच या मार्गावर इतर अनेक किल्ले मस्तच सजवलेले आहेत. सर्वांनी हे किल्ले बनवण्यासाठी वापरलेले साहित्य, सजावट इत्यादींबद्दल जाणून घेतले. Cycle tour to see forts in Diwali

Cycle tour to see forts in Diwali

सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी. या हेतूने सर्वांसाठी दापोली सायकलिंग क्लबमार्फत अनेक उपक्रम राबवले जातात. या सायकल फेरीचे नियोजन करण्यात अंबरीश गुरव, रोहन कदम, सुरज शेठ, विनय गोलांबडे, सचिन खटावकर, केतन पालवणकर, संदेश चव्हाण इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली. ६ नोव्हेंबर २०२२ रोजी दापोली विंटर सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याची नोंदणी लवकर करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे. Cycle tour to see forts in Diwali

Tags: Cycle tour to see forts in DiwaliGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share15SendTweet9
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.