• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

भारत-मोझांबिक-टांझानिया त्रिपक्षीय सराव

by Guhagar News
October 30, 2022
in Bharat
21 1
0
India-Mozambique-Tanzania Trilateral Exercise
42
SHARES
121
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई, ता. 30 : भारत-मोझांबिक-टांझानिया त्रिपक्षीय सरावाची  (आयएमटी ट्रायलॅट)  पहिली आवृत्ती पार पडली.  भारतीय, मोझांबिक आणि टांझानियन नौदलांमधील संयुक्त सागरी सराव 27 ऑक्टोबर 22 रोजी टांझानियाच्या दार एस सलाम येथे सुरू झाला. भारतीय नौदलाचे प्रतिनिधित्व मार्गदर्शित क्षेपणास्त्र लढावू गलबत, आयएनएस  तर्कश, चेतक हेलिकॉप्टर आणि मार्कोस  (विशेष दल) यांनी  केले. India-Mozambique-Tanzania Trilateral Exercise

या सरावाची तीन व्यापक उद्दिष्टे आहेत: प्रशिक्षण आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण, आंतरकार्यक्षमता वाढवणे आणि सागरी सहकार्य बळकट करून सामान्य धोक्यांना तोंड देण्यासाठी क्षमता विकसित करणे. हा सराव 27 ते 29 ऑक्टोबर 22 या तीन दिवसांच्या कालावधीत झाला, असून त्यात बंदर आणि सागरी टप्प्यांचा समावेश आहे. India-Mozambique-Tanzania Trilateral Exercise

India-Mozambique-Tanzania Trilateral Exercise

बंदर टप्प्याचा भाग म्हणून, भेट देणे,‘ बोर्ड होणे’, शोध घेणे आणि जप्तीचे कार्य करणे, यासारखी क्षमता निर्माण कार्ये ; लहान शस्त्रांचे प्रशिक्षण, संयुक्त डायव्हिंग ऑपरेशन्स, नुकसान नियंत्रण आणि अग्निशमन व्यायाम, आणि ‘ क्रॉस डेक’ भेटी नियोजित करण्‍यात आल्या आहेत. सागरी  टप्प्यात बोट ऑपरेशन्स, फ्लीट मॅन्युव्हर्स, भेट, बोर्ड, शोध आणि जप्ती ऑपरेशन्स, हेलिकॉप्टर ऑपरेशन्स, लहान शस्त्रांनी गोळीबार, फॉर्मेशन अँकरिंग आणि ईईझेड गस्त यांचा समावेश आहे. India-Mozambique-Tanzania Trilateral Exercise

अशा प्रकारचे सराव सागरी सुरक्षा आणि हिंद महासागर क्षेत्रातील सागरी शेजारी देशांसोबत सहकार्य वाढविण्याच्या आणि सर्वांसाठी विकासाला चालना देण्याच्या भारताच्या  आणि भारतीय नौदलाच्या  वचनबद्धतेला प्रतिबिंबित करत आहेत. India-Mozambique-Tanzania Trilateral Exercise

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiIndiaIndia-Mozambique-Tanzania Trilateral ExerciseLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMozambiqueNews in GuhagarTanzaniaUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share17SendTweet11
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.