भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री संतोष जैतापकर यांनी गुहागर विधानसभामध्ये केले वाटप
गुहागर, ता. 30 : सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणारे, कमी कालावधीत तरुणांच्या मनातील ताईत झालेले भाजपा ओबीसी मोर्चा संतोष जैतापकर यांनी गुहागर विधानसभेत 30 हजार दिपावली सुगंधी उटणे वाटप केले. त्यामध्ये गुहागर पोलीस स्टेशन, तहसीलदार कार्यालय, शहरातील रिक्षा संघटना आणि प्रत्येक घरात उठणे वाटप करण्यात आले. Jaitapkar distributed Diwali cosmetic

तसेच विधानसभेमधील कार्यकर्ते यांनी उठणे वाटपामध्ये चांगले सहकार्य करून प्रत्येक घरात सुगंधी उटणे पोचले पाहिजे. याची काळजी घेत होते. संतोष जैतापकर हा उपक्रम प्रत्येक वर्षी दिवाळीला करत असतात. त्यांनी मुंबई, ठाणे, पालघर मधील चाकरमानी यांना सुद्धा 5000 हजार उटणे वाटप केले. या उपक्रम बद्दल त्याचे सर्वच पक्षातील पदाधिकारी यांनी आणि जनतेने आभार मानले. Jaitapkar distributed Diwali cosmetic

श्री. जैतापकर हे गुहागर तालुक्यातील सुपूत्र आहेत. राजकारणापेक्षा पहिले समाजकारण करण्यासाठी त्यांचे प्रथम प्राधान्य असते. तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय व क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान आहे. तसेच मुंबईतही तळमळीने काम करतात. अशा विविध ठिकाणी मदतीचा हात त्यांनी नेहमीच पुढे केला आहे. कोणत्याही संकटात ते नेहमीच पुढे असतात. लोकप्रतिनिधी नसतानादेखील त्यांच्याकडून केले जात असलेले सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. Jaitapkar distributed Diwali cosmetic
