गुहागर, 29 : परदेशी जायचं म्हटलं की पहिल्यांदा आपली धावाधाव होते ती पासपोर्टसाठी. कारण दुसऱ्या देशात जायचं म्हटलं की पासपोर्ट हा गरजेचाच. जर नसेल तर तो काढावा लागणार. मात्र तुम्हाला माहितीये का? जगात अशाही व्यक्ती आहेत ज्यांना कुठेही जगभरात फिरायचं असेल तर पासपोर्टची (passport) गरज लागत नाही. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. पण हो…खरंच मात्र जगभरात पासपोर्ट शिवाय फिरण्याची मुभा असणाऱ्या व्यक्ती केवळ 3 आहेत. 3 persons do not need a passport to travel the world
आपल्या देशाचं सरकार देत असलेल्या पासपोर्टमध्ये आपण कोण आहोत, नेमके कुठचे आहोत, आपलं नाव, आपण कसे दिसतो हे सांगण्याऱ्या गोष्टी असतात. हे अधिकृत ओळखपत्र असतं ज्याच्या मदतीने आपण सुरक्षितरित्या जगात कुठेही जाऊ शकतो. मात्र जगातील या 3 व्यक्ती सोडल्या तर सर्वांना पासपोर्ट घेऊन फिरणं अगदी बंधनकारक आहे. यामध्ये कोणत्याही देशाचे पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींनाही सूट नाहीये. 3 persons do not need a passport to travel the world


पासपोर्टशिवाय फिरता येणाऱ्या या 3 व्यक्ती म्हणजे ब्रिटनचा राजा (King of Britain), जपानची राणी (Queen of Japan) आणि जपानचा राजा! (King of Japan) या 3 व्यक्तींना सोडून सर्वांना पासपोर्ट असणं आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वीच चार्ल्स तिसरे ब्रिटनचे राजे झाले. आई आणि राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर त्यांनी या पदाची जबाबदारी स्विकारली आहे. महाराज होताच ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांना कुठेही जाण्यासाठी मुभा देण्यात यावी तसंच त्यांच्या प्रोटोकॉलचीही काळजी घेतली जावी, असे ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सर्व देशांना कळवलंय. 3 persons do not need a passport to travel the world
राजा चार्ल्सच्या आधी त्याची आई राणी एलिझाबेथ दुसरी यांना पासपोर्टशिवाय कुठेही जाण्याची मुभा होती. सिंहासनावर बसलेल्या राजा किंवा राणीलाच पासपोर्टशिवाय कुठेही जाण्याचा अधिकार आहे. दरम्यान राजा चार्ल्स तिसरा यांच्या पत्नीला ही मुभा नाहीये. त्यांना डिप्लोमॅटिक पासपोर्टची गरज लागते. 3 persons do not need a passport to travel the world


जपानमध्ये (Japan) पासपोर्टशिवाय परदेशात जाण्याची पद्धत 1971 मध्ये सुरू झालीये. जपानचा सम्राट हा जपानच्या शाही कुटुंबाचा प्रमुख आहे. जपानच्या राज्यघटनेनुसार, त्याला जपानी राज्याचे आणि जपानी लोकांच्या ऐक्याचे प्रतीक म्हणून परिभाषित केले आहे आणि त्याचे स्थान “ज्यांच्याकडे सार्वभौम सत्ता राहतात अशा लोकांच्या इच्छेवरून” प्राप्त होते. 30 एप्रिल 2019 रोजी अकिहितोचा सर्वात मोठा मुलगा, वर्तमान सम्राट नारुहितो (Emperor Naruhito) यांच्याकडे गादी सोपवण्यात आली. तेव्हापासून सम्राट नारूहितो आणि त्याची पत्नी मसाको ओवादा या जपानच्या राणी आहेत. 3 persons do not need a passport to travel the world
Tags : गुहागर मराठी बातम्या, Updates of Guhagar, Latest News on Guhagar, Guhagar News in Marathi, Guhagar News, Marathi News, मराठी बातम्या, News in Guhagar, ताज्या बातम्या, लोकल न्युज, Guhagar, टॉप न्युज, Latest News, Latest Marathi News, passport, पासपोर्ट, King of Britain, Queen of Japan, King of Japan, राणी एलिझाबेथ, Queen Elizabeth, राजा चार्ल्स, King Charles, जपान, Japan, सम्राट नारुहितो, Emperor Naruhito,