आदित्य ठाकरेंचा आरोप, उद्योग मंत्री सामंत यांचा पलटवार
मुंबई, ता. 28 : खोके सरकारने अजून एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवला. त्यामुळे खोके सरकारवर उद्योग जगताचा विश्वास उरलेला नाही. असा आरोप उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला. त्याला प्रत्युत्तर देताना उद्योग मंत्री सांमत यांनी शिळ्या कढीला पुन्हा उकळी फोडण्याचे उद्योग सुरू आहेत. टाटा एअरबस प्रकल्प ठाकरे सरकारने पाठपुरावा न केल्याने एक वर्षापूर्वीच महाराष्ट्राबाहेर गेला. असा आरोप केला. Airbus project out of Maharashtra by Govt

आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘टाटा एअरबस प्रकल्प’ महाराष्ट्राबाहेर जाऊ नये ह्यासाठी प्रयत्न करा, अशी मागणी मी जुलै महिन्यापासून सातत्याने करत होतो, पण पुन्हा तेच झालं. गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने महाराष्ट्रातले प्रकल्प बाहेर का जात आहेत? खोके सरकारवर उद्योगजगताचा विश्वास उरलेला नाही, हे यातून दिसतच आहे. जवळपास 4 प्रकल्प महाराष्ट्रातून निसटल्यावर तरी उद्योगमंत्री राजीनामा देणार का? असा प्रश्न ही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. Airbus project out of Maharashtra by Govt

टाटा-एअरबस प्रकल्पावरून होत असलेल्या आरोपांवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, एका वर्षापूर्वीच तो प्रकल्प गुजरातला जायचा निर्णय झाला. शिळ्या कढीला उकळी फोडण्यामध्ये अर्थ नाही. एमओयू झाल्यानंतर मागच्या सरकारचं एकही पत्र उद्योग विभागात सापडलं नाही. सत्तेत असताना ज्यांनी या प्रोजेक्टसाठी प्रयत्न केले नाहीत, त्यांनी युवा पिढीमध्ये संभ्रम निर्माण करण्यात अर्थ नाही. Airbus project out of Maharashtra by Govt
