दापोली, ता. 28 : निसर्ग चक्रीवादळाच्या आपत्तीने आधीच उध्दवस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम बॉक्साईट उत्खनामुळे उंबरशेत रोवलेत होणार आहे. त्यामुळे येथील शेतकरी तीव्र आंदोलनाच्या तयारी आहेत. Villagers’ opposition to bauxite mining
दापोली तालूक्यातील उंबरशेत तसेच रोवले या महसूली गावाच्या हद्दीत बॉक्साईट उत्खननाचे काम सन 2005 मध्ये सुरू झाले. मात्र पर्यावरणाचा -हास होणाऱ्या या उदयोगामुळे उंबरशेत रोवलेचा परिसर भकास होत गेला. हे लक्षात आल्यावर येथील जागृत नागरिकानी एकत्र येवून येथील बॉक्साईट उत्खननाचे काम बंद पाडले. 4 वर्ष बंद स्थितित असलेल्या या उदयोगाने परत एकदा डोके वर काढले असून बॉक्साईट उत्खनन सुरू करण्याचा घाट कंपनीकडून घातला जात आहे. याला मात्र येथील शेतक-यांचा तीव्र विरोध आहे. Villagers’ opposition to bauxite mining

सन 2005 पासून रोवले उंबरशेत या परिसरात सुरू असलेल्या बॉक्साईट खनीज उत्खननामुळे येथे पूर्वी घनदाट असलेले जंगल नष्ट झाले आहे. त्यामुळे येथे प्राण्यांच्या अधिवासाचा प्रश्न गंभीर बनला आहे. बॉक्साईट कंपनीला खनीकर्म विभागाकडून दिलेल्या शर्ती आणि अटींचा भंग होत असून खनीकर्म विभागाने खोदण्याची घालून दिलेली मर्यादा उत्खनन करणारे पाळत नसल्याने येथील पाण्याची पातळी खोल जावून येथे पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. बॉक्साईट उत्खननामुळे सर्वत्र वाहून आलेल्या खडीसदृष खडशामुळे शेती नापीक बनली आहे. अशाप्रकारच्या एक ना अनेक समस्या निर्माण झालेल्या असताना परत एकदा बॉक्साईट उत्खनाचा घाट घातला जात आहे. याविरोधात येथील पर्यावरणप्रेमींसह स्थानिक शेतकरी फळबागायतदार जन आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत. Villagers’ opposition to bauxite mining
रत्नागिरी जिल्हयातील दापोली तालूक्यातील केळशी हा परिसर निसर्ग संपदेच्या संपन्नतेने नटलेला असा परिसर ओळखला जातो. अशा या परिसरातील केळशी गावाला स्वच्छ सुंदर समुद्र किनारपट्टी लाभल्याने पर्यटकांचा या निसर्गरम्य परिसरात येण्याचा ओघ अधिक वाढला आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायातून येथे रोजगार निर्मिती होवू लागली असतानाच या परिसरातील रोवले उंबरशेत येथे बॉक्साईटच्या केल्या जाणाऱ्या उत्खननामुळे हा परिसरात पार उध्दवस्त होत चालला होता. हे चित्र पालटण्यासाठी पर्यावरणप्रेमी आणि शेतकऱ्यांनी एकत्र येत संघर्ष केला. तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थित वेळोवेळी जन सुवण्या घेण्यात आल्या त्या जन सुवण्यांमध्ये उत्खननामुळे होणारे तोटे निदर्शनात आणत येथील रहीवाशांनी बॉक्साईट उत्खननाला प्रखर विरोध केला. याचा परिणाम म्हणून बॉक्साईट खनीजाचे मर्यादित आणि चोरी छुपके उत्खनन केले जात असायचे. मात्र त्यालाही विरोध होत गेला. त्यामुळे गेली चार वर्ष येथील बॉक्साईट खनीजाचे होणारे उत्खनन पूर्णतः बंद ठेवण्यात आले. Villagers’ opposition to bauxite mining
आता पुन्हा एकदा बंद असलेले उत्खनन सुरू करण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडवून पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या या बॉक्साईट उत्खननाला येथील पर्यावरणप्रेमी तसेच शेतकऱ्यांकडून विरोध केला जाणार आहे. त्यामुळे बॉक्साईट उत्खनन करणारी कंपनी, महसुल तसेच खनीकर्म अधिकारी आणि पर्यावरणप्रेमी व शेतकरी यांच्यामध्ये मोठा संघर्ष उभा राहण्याची शक्यता अधिक वाटत आहे. Villagers’ opposition to bauxite mining
दापोली तालूक्यातील रोवले तसेच उंबरशेत या महसूली गावातील खाण पट्टा हा शासनाने मंजूर केलेला खाण पट्टा आहे. उत्खनना विरोधात कोणीही आपल्याला भेटलेले नाही. मध्यंतरी कंपनीने स्वतःहूनच उत्खनन बंद ठेवले होते. मात्र शासनाकडून खाण पट्टयातील उत्खनन बंद ठेवण्याचे आदेश पाळीत नाहीत त्यामुळे येथील उत्खनन सुरूच राहणार असल्याची माहीती जिल्हा खनीकर्म अधिकारी दि. म. पाटील यांनी दिली. Villagers’ opposition to bauxite mining
