• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 December 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

MMCMSS शिष्यवृत्तीसाठी शेवटची ता. 31 ऑक्टोबर

by Guhagar News
October 27, 2022
in Maharashtra
17 0
0
Apply for National Scholarship Scheme
33
SHARES
95
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर अर्ज करा.

नवी दिल्‍ली, ता. 27 : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी असलेल्या राष्ट्रीय साधन तथा गुणवत्ता शिष्यवृत्ती (NMMSS) शिष्यवृत्तीसाठी 2022-23 या वर्षासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख  31 ऑक्टोबर 2022 आहे. तरी कोकणातील जास्तीत जास्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांनी 31 ऑक्टोबरच्या आत https://scholarships.gov.in/fresh/schemeSelRegfrmInstruction या पोर्टलवर जावून आपले अर्ज भरावेत. Apply for National Scholarship Scheme

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी असलेली राष्ट्रीय साधन तथा  गुणवत्ता शिष्यवृत्ती, नॅशनल मीन्स कम मेरिट शिष्यवृत्ती योजना NMMSS ही आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांची आठव्या इयत्तेनंतर होणारी गळती रोखण्याच्या आणि शिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यातही त्यांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दिली जाते. प्रत्येक वर्षी इयत्ता नववीमधील निवडक मुलांना एक लाख नवीन शिष्यवृत्ती बहाल केल्या जातात तसेच राज्य सरकारी, सरकारी अनुदानित किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना इयत्ता दहावी ते बारावीपर्यंत ही शिष्यवृत्ती सुरू रहाते. या शिष्यवृत्तीची रक्कम वार्षिक 12,000 एवढी असते. Apply for National Scholarship Scheme

राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल म्हणजेच NSP हा विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती योजनेसाठीचा एकात्मिक  डिजिटल मंच आहे. त्यावर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांसाठीची शिष्यवृत्ती योजना ( NMMSS )आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांसाठीच्या शिष्यवृत्ती त्यासाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केल्या जातात.  ही शंभर टक्के केंद्र पुरस्कृत योजना आहे. Apply for National Scholarship Scheme

ज्या मुलांच्या पालकांचे सर्व स्रोताकडून मिळणारे उत्पन्न वार्षिक साडेतीन लाखापेक्षा जास्त नसेल ते विद्यार्थी या शिष्यवृत्तीला पात्र आहेत. या शिष्यवृत्तीसाठी असलेल्या निवड परीक्षेला पात्र ठरण्यासाठी विद्यार्थ्यांना सातवीच्या परीक्षेत किमान 55 टक्के गुण किंवा तत्सम श्रेणी असणे आवश्यक आहे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमातीच्या  विद्यार्थ्यांसाठी गुणांमध्ये पाच टक्क्यांची सवलत आहे.) Apply for National Scholarship Scheme

यासाठी दोन टप्प्यात पडताळणी केली जाते. पहिल्या टप्प्यात संस्थेच्या नोडल अधिकाऱ्याकडून (INO) तर दुसऱ्या टप्प्यात जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्याकडून (DNO) अर्जाची पडताळणी होते. पहिल्या टप्प्यातल्या पडताळणीसाठी (INO-L1)शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2022 तर दुसऱ्या टप्प्याच्या पडताळणीसाठीची(DNO-L2) तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे. Apply for National Scholarship Scheme

Tags: Apply for National Scholarship SchemeGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.