• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आ. भास्कर जाधव यांचे दिवाळीनंतर राज्यात दौरे

by Ganesh Dhanawade
October 27, 2022
in Politics
17 0
0
MLA Jadhav's tour in the state
34
SHARES
97
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

शिवसेनेला चांगले दिवस यावेत यासाठी पक्षप्रमुखांच्या नेतृत्वाखाली राज्यभर काम करणार

गुहागर, ता. 27 : ज्यांना कसलाही अधिकार नाही, राजकीय कुवत नाही असे लोक एका पक्षाच्या प्रमुखाला आणि राज्याच्या माजी मुख्यमंत्र्याला कानफटात मारण्याची भाषा करतात, तेव्हा माझ्यासारखा सामान्य शिवसैनिक शांत बसू शकत नाही. मला फार वेदना झाल्या, त्यामुळे माझी सहनशीलता संपली. आता मला मारून जर शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर मी मरणाला घाबरत नाही. राज्यात शिवसेनेला चांगले दिवस यावेत, यासाठी मी पक्षप्रमुखांच्या नेतृत्वाखाली राज्यभर काम करणार आहे. कार्यकर्ते मला शांत बसू देत नाहीत त्यामुळे दिवाळीनंतर पुन्हा माझे दौरे सुरू होतील, असे प्रतिपादन आमदार भास्कर जाधव यांनी केले. MLA Jadhav’s tour in the state

शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव दिवाळीनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघणार आहेत. दिवाळीनंतर ते पुन्हा भाजपा आणि शिवसेनेतील ४० बंडखोर आमदारांचा समाचार घेण्याची शक्यता त्यांच्या समर्थकानी व्यक्त केली. आ. जाधव यांनी भाजप नेतृत्व, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटातील आमदारांवर बोलू नये, यासाठी त्यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. राज्यातील शिवसेना फुटल्यानंतर आ. भास्कर जाधव यांना शिवसेनेचे नेतेपद देण्यात आले. त्यांनी महाराष्ट्रात फिरून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर त्यांनी टीका केली. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी आ. जाधव यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. MLA Jadhav’s tour in the state

गुहागर मतदार संघात त्यांच्या कार्यकर्त्यांची फोडाफोडी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे कुडाळ आणि मुंबईच्या सभेनंतर आ. जाधव यांची सुरक्षा कमी करण्यात आली. आ. जाधव यांच्यावर राज्यात गुन्हे दाखल होत असताना दुसरीकडे त्यांची सुरक्षा कमी करण्यात आली. या दरम्यान त्यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. गुहागरमध्ये राजकीय फटाके फुटणार असे सोशल मीडियावर संदेश पाठवले जात आहेत. MLA Jadhav’s tour in the state

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMLA Jadhav's tour in the stateNews in GuhagarPoliticsUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.