गुहागर, ता. 25 : गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शहरप्रमुख निलेश मोरे यांच्या संकल्पनेतून किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. युवासेना गुहागर शहर आयोजित शहर मर्यादित या स्पर्धेला स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. Guhagar Yuva Sena organizes fort competition

या स्पर्धेत किल्ल्याची प्रतिकृती ऐतिहासिक पार्श्वभूमीवर असावी. किल्ला पर्यावरण पूरक असावा. किल्ला पूर्ण झाल्यावर किल्ल्याचा एक फोटो व किल्ल्या सोबतचा एक सेल्फी पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रथम क्रमांकास 3333/-, सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास 2222/-, सन्मानचिन्ह तर तृतीय 1111/- व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. Guhagar Yuva Sena organizes fort competition
स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी राज विखारे ( 7507509557), केदार वराडकर (7798528811), सोहम साताडेकर ( 7754040543), प्रसाद गुरव ( 7875158922), शुभम तवसाळकर ( 9145187399), किरण पावसकर (7507487148) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. Guhagar Yuva Sena organizes fort competition
