गुहागर, ता. 25 : सालाबादप्रमाणे महापुरुष क्रिकेट संघाच्या नवीन वर्षाच्या क्रिकेट हंगामाची सुरवात दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आली. यावेळी महापुरुष मंदिरात महापुरुष महाराजांच्या पुजन करण्यात आले. चालू क्रीडा वर्षात सर्व खेळाडूंना आणि त्यांच्या कुटुंबाला सुख समाधानाचे आणि भरभराटीचे जावो. यावेळी महापुरुष संघाला विजयी ठेवण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. The beginning of cricket of the Mahapurush team

दिवाळीच्या निमित्ताने पोलीस ग्राउंडवर दिवाळीच्या दिवशी झालेल्या तीनही मॅचमध्ये विजय संपादित करून महापुरुष संघाने नवीन सिझनची दिमाखात सुरवात केली. पहिली मॅच फ्रेंड्सर्कल विरुद्ध खेळताना तीन षटकाच्या सामन्यात 24 रन्स चेस करत विजय मिळवला. तर दुसरी मॅच सागरपुत्र विरुद्ध खेळताना तीन षटकात फक्त 14 धावा झाल्या असताना देखील समोरच्या टीमला 14 च रन्स वर रोखून विजय मिळावीला. यावेळी महेश, राकेश, युवराज, प्रेम यांची अप्रतिम गोलंदाजी, रुपेश गावडे, यश लोखंडे व इतर सर्वच प्लेअर्सची अप्रतिम फिल्डिंगचे प्रदर्शन करत संघाच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला. तिसरी मॅच पूर्ण गुहागर तालुका विरुद्ध महापुरुष असा झाला. चार षटकात 42 रन्सचे टार्गेट असताना यश आणि रुपेश यांची अप्रतिम खेळी करत विजयी मिळवला. या सामन्यात रुपेश गावडेच्या गगन चुंबी षटकाराने सगळ्यांच्याच डोळयांच पारणं फिटलं. The beginning of cricket of the Mahapurush team

महापुरुष संघाच्या वतीने उपस्थितीत सर्व संघ आणि खेळाडूंना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. व येणारे वर्ष सर्वांना यश देणारे, सुखसमाधानाचे व निरोगी जाओ यासाठी प्रार्थना करण्यात आली. The beginning of cricket of the Mahapurush team
