• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरीतील मच्छिमारांना दिलासा

by Ganesh Dhanawade
October 25, 2022
in Ratnagiri
18 0
0
Diesel refund granted to fishermen
35
SHARES
99
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मच्छीमार सहकारी सोसायट्यांच्या सदस्यांना नौकेच्या डिझेल अनुदानाची थकबाकी रक्कम वितरित करण्याचे आदेश

रत्नागिरी, ता. 25 : मच्छीमार सहकारी सोसायट्यांच्या सदस्यांना नौकेच्या डिझेलवर देण्यात येणाऱ्या अनुदानाची थकबाकीची रक्कम वितरित करण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. शासनाच्या आदेशानुसार रत्नागिरी जिल्ह्याला सुमारे दोन कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे दिवाळीपूर्वी मच्छिमारांना दिलासा मिळाला आहे. Diesel refund granted to fishermen

रत्नागिरी जिल्ह्याला सुमारे दोन कोटी रूपये मंजूर

मच्छिमार सहकारी सोसायट्यांच्या सदस्यांना त्यांच्या नौकेकरता लागणाऱ्या डिझेलवरील कराची प्रतिपूर्ती अनुदान स्वरूपात केली जाते. मात्र, गेल्या काही काळापासून हे अनुदान थकीत असल्याबद्दल मत्स्यव्यवसाय, वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन प्राप्त झाली होती. या निवेदनांची दखल घेऊन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विभागाला अनुदानाची थकबाकी लवकरात लवकर वितरित करावी, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शासनाने आदेश काढला आहे. Diesel refund granted to fishermen

डिझेल परताव्याच्या थकबाकीचे वितरणही सुरू करण्यात आले आहे. या अनुदानापोटी १८ कोटी ३७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.  ‘प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर या थकीत निधीचे वितरण करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी दोन कोटींचा डिझेल परतावा मंजूर करण्यात आला आहे. हा परतावा लवकरच मच्छिमारांना देण्यात येणार आहे. Diesel refund granted to fishermen

Tags: Diesel refund granted to fishermenGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.