• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तालुक्यातील ४२ प्राथमिक शाळांमध्ये वह्या वाटप

by Ganesh Dhanawade
October 23, 2022
in Guhagar
28 0
0
Distribution of book in primary schools
54
SHARES
155
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

ज्येष्ठ नेते चंद्रकांत धोंडू बाईत यांच्या वाढदिवसानिमित्त

गुहागर, ता. 23 : लोकशिक्षण मंडळ आबलोलीचे कार्याध्यक्ष, गुहागर तालुक्याचे माजी सभापती, ज्येष्ठ नेते चंद्रकांत धोंडू बाईत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना तालुकाप्रमुख सचिन बाईत यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर तालुक्यातील ४२ प्राथमिक शाळांमध्ये वह्या वाटप करण्यात आले. Distribution of book in primary schools

युवा नेते शुभम बाईत यांच्या पुढाकारातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. चंद्रकांत बाईत यांनी केलेले शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य आणि त्यांचे या क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन तोच वारसा पुढे नेण्याचे काम आपणास करावयाचे आहे असे त्यांनी सांगितले.  Distribution of book in primary schools

Distribution of book in primary schools

तालुकाप्रमुख बाईत यांचे राजकारणाबरोबरच लोकाभिमुख कार्यात मोठे योगदान राहिले आहे. पाणी टंचाईग्रस्त गावात वनराई बंधारे असो वा कोरोना काळात सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत, आर्थिक मदत, वैद्यकीय सेवा या सर्व कार्यात बाईत यांचा पुढाकार राहिला आहे. आबलोली आणि पंचक्रोशीतील नागरिकांसाठी बाईत यांच्या रूपाने प्रसिद्धी पासून अलिप्त असलेल्या खऱ्याखुऱ्या लोकप्रतिनिधीची गरज आहे. तशी अपेक्षाहि नागरिक व्यक्त करत आहे. Distribution of book in primary schools

Distribution of book in primary schools

या कार्यक्रमाच्यावेळी शुभम बाईत, तालुका सचिव विलास गुरव, प्रा. अमोल पवार, रजत बाईत, शुभम साळवी, राकेश साळवी, शंकर पागडे, आशिष भोसले, संदीप मोहिते आदींसह शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. विलास गुरव यांनी सर्वांचे आभार मानले. Distribution of book in primary schools

Tags: Distribution of book in primary schoolsGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share22SendTweet14
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.