• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरमध्ये एक दिवा शहिंदासाठी आणि जवानांसाठी

by Ganesh Dhanawade
October 23, 2022
in Guhagar
26 1
0
A lamp for Shahind and Jawans
52
SHARES
148
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

शिवतेज फाऊंडेशने जपली कृतज्ञता आणि संवेदना व्यक्त करण्याची परंपरा

गुहागर, ता. 23 : दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या भारतीय जवानांना तसेच सीमेवर लढणार्‍या आणि कुटूंबापासुन दूर राहुन कर्तव्य बजावणार्‍या भारतीय जवानांप्रती कृतज्ञता आणि संवेदना व्यक्त करण्यासाठी एक दिवा शहिदांसाठी आणि भारतीय जवानांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. हा उपक्रम गड किल्ले याचे संवर्धन करणाऱ्या शिवतेज फाऊंडेशन गुहागर व समस्त गुहागर वासियांच्या वतीने घेण्यात आला. दिपावलीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी शहरातील गांधी चौक येथे उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे हे नववे वर्ष आहे. A lamp for Shahind and Jawans

टिव्ही किंवा वर्तमानपत्रात बातम्या पाहून केवळ हळहळ व्यक्त न करता सर्व गूहागरवासीय जवानांप्रती असलेली कृतज्ञता व संवेदना व्यक्त करण्यासाठी कोणतेही राजकीय व सामाजिक अभिनीवेश न बाळगता एकत्र आले होते. ही बाब गुहागरवासीयांनी प्रत्येक वर्षी कृतीतून दाखवून दिली आहे. यावर्षी देखील मोठ्या संख्येने आपल्या कुटुंबियांसोबत व मित्रपरिवारासहित या कार्यक्रमाला उपस्थित होते. A lamp for Shahind and Jawans

A lamp for Shahind and Jawans

या कार्यक्रमासाठी गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल, शिवतेज फाऊंडेशन चे अध्यक्ष ॲड. संकेत साळवी, पोलिस उपनिरीक्षक पवन कांबळे, सचिव निलेश गोयथळे, खजिनदार गणेश धनावडे, संचालक राजेंद्र आरेकर, संतोष वरंडे, विकास मालप, सुहास सातार्डेकर, अलंकार विखारे, राहुल कनगुटकर, अंकुश विखारे, माजी नगराध्यक्ष स्नेहा वरंडे, लायन्स क्लब, गुहागर अध्यक्ष शामकांत खातू, विश्वनाथ रहाटे, ज्ञानेश्वर झगडे, नगरसेवक प्रसाद बोले, माधव साटले, समीर घाणेकर, होमगार्ड तालुका समदेशक सुधाकर कांबळे, प्रभुनाथ देवळेकर, आरोग्य व स्वच्छता समिती सभापती स्नेहा रेवाले, बांधकाम सभापती वैशाली मालप, दिपक कनगुटकर, माजी सैनिक सुनील जाधव, दीपक सकपाळ, प्रताप शिर्के, प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्व विद्यालय, गुहागर शाखेच्या शिल्पा बहेंजी, श्रद्धा घाडे, सारिका कणगुटकर, पारिजात कांबळे, शिवतेज परिवार व गुहागरवासिय उपस्थित होते. यावेळी शेकडो दिवे प्रज्वलित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीवनश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष वरंडे यांनी केले. A lamp for Shahind and Jawans

Tags: A lamp for Shahind and JawansGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share21SendTweet13
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.