गुहागर, ता. 22 : रत्नागिरी जिल्ह्यातील लोकप्रिय असणाऱ्या वरंडे विमा सेवा केंद्राकडून पाटपन्हाळे महाविद्यालयातील गरजू व हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यात आली. हा कार्यक्रम गुरूवार दि. 20 ऑक्टोबर रोजी मॉक इंटरव्ह्यू स्पर्धेच्या बक्षिस वितरणावेळी घेण्यात आला. Assistance from Varande Insurance Service Center

विमा सेवा केंद्राकडून समाजातील गरजू व हुशार विद्यार्थ्यांना नेहमीच मदत केली जाते. वरंडे विमा सेवा केंद्राचे प्रमुख श्री. संतोष वरंडे यांनी महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची संपूर्ण वार्षिक फि भरण्याचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन त्यांनी सहकुटुंब येऊन पूर्ण केले. यावेळी त्यांच्या पत्नी सौ. स्नेहल वरंडे ही उपस्थित होत्या. यावेळा व्दितीय वर्ष वाणिज्य वर्गातील कु. श्वेता शितप, व प्रथम वर्ष वाणिज्य वर्षातील कु. अवंतिका वाडकर या दोन्ही मुलींची संपूर्ण फी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद देसाई यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आली. Assistance from Varande Insurance Service Center

यावेळी श्री. वरंडे म्हणाले की, मुलींनी शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करावी. महाविद्यालयाचे व आईवडीलांचे नाव मोठे करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच समाजातील चांगल्या गोष्टींसाठी वरंडे विमा सेवा केंद्र नेहमीच पुढे असेल असेही सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद देसाई यांनी दोघांचे विशेष आभार मानले. यावेळी पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. भालचंद्र चव्हाण व सर्व संचालकांनी त्यांचे कौतुक करून संबंधित विद्यार्थ्यांना केलेल्या मदतीबद्दल त्यांचे विशेष आभार व्यक्त केले. यावेळी वाणिज्य विभाग प्रमुख श्री. सुभाष खोत, इतिहास विभाग प्रमुख श्री. प्रसाद भागवत व महाविद्यालयाचा जी एस प्रणव टाणकर उपस्थित होते. Assistance from Varande Insurance Service Center
