• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

विद्यार्थ्यांनी बनविले कंदील व शुभेच्छापत्रे

by Ganesh Dhanawade
October 22, 2022
in Guhagar
21 1
0
New works of art by students of Patpanhale
42
SHARES
120
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पाटपन्हाळे विद्यालयात कार्यानुभव ; नविन कलाकृतींची निर्मिती

गुहागर, ता. 22 : तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे मधील इयत्ता आठवीच्या ब व क तुकडीतील विद्यार्थ्यांनी कार्यानुभव तासाला वेगवेगळे आकाश कंदील व सुंदर पद्धतीने नवनवीन डिझाईन्समध्ये वेगवेगळी शुभेच्छापत्रे तयार केली. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कंदील व शुभेच्छा पत्रांचे मुख्याध्याकांनी भरभरून कौतुक केले. New works of art by students of Patpanhale

दिवाळी किंवा दीपावली हा एक प्रमुख हिंदू सण आहे. हा दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदिल) लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जाते. पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात हा सण येतो. आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे सहा दिवस या सणाचे असतात. हा सण साधारणपणे ऑक्टोबर – नोव्हेंबर दरम्यान येत असतो. हा एक पवित्र सण आहे जो वाईटावर चांगल्‍याच्‍या विजयाचे प्रतिक आहे. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा. म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. New works of art by students of Patpanhale

New works of art by students of Patpanhale

विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा दीपोत्सव म्हणजे अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा उजेड आयुष्यामध्ये निर्माण करणे होय. या सणाची सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. अशावेळी प्रशालेच्या कार्यानुभव तासाला विद्यार्थ्यांकडून आकाश कंदिल, पणत्यांचे रंगकाम , वेगवेगळी शुभेच्छापत्रे तयार करून घेणे यासारखा सुंदर उपक्रम तो कोणता ? विद्यार्थी या उपक्रमांमध्ये अत्यंत आनंदाने आणि हौसेने सहभागी होतात. न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे मधील विद्यार्थ्यांनी प्रतिनिधी स्वरूपात काही शुभेच्छा पत्र व कंदील मुख्याध्यापकांना भेट दिले.  New works of art by students of Patpanhale

यावेळी बोलताना मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार यांनी सर्व विद्यार्थ्यांना दिवाळी सणाच्या खुप सार्‍या शुभेच्छा दिल्या. त्याबरोबरच बाजारामध्ये या सर्व वस्तू उपलब्ध आहेत, त्याची आपण किंमत मोजतो. पण जेव्हा आपण या वस्तू स्वतःच्या हाताने तयार करतो तेव्हा त्याला असणारे मोल काही औरच असते. अशा शब्दात विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या आठवणी तुम्हाला आयुष्यभर पुरतील असे सांगत ते म्हणाले की अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या हस्तकलांना वाव मिळतो. या उपक्रमाचे आयोजन करणाऱ्या सौ. नमिता वैद्य यांचेही मुख्याध्यापकांनी अभिनंदन केले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. New works of art by students of Patpanhale

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNew works of art by students of PatpanhaleNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share17SendTweet11
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.