गुहागर, ता. 22 : कोकणातील पर्यटन केंद्रबिंदू म्हणून गुहागर विकसित होत आहे. वर्षभरात मोठ्या संख्येने पर्यटक गुहागरमध्ये येत असतात. येणाऱ्या पर्यटकांना व स्थानिक नागरिकांना समुद्राकिनारी बसण्यासाठी लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर संस्थेने सार्वजनिक बाकडी उपलब्ध करून दिली आहेत. या संस्थेने दिवाळीनिमित्त सर्वांना ही अनोखी भेट दिली आहे. Unique Gift by Arekar Foundation

गुहागर मधील विविध भागात ही बाकडी बसविण्यात येणार आहेत. लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठानच्या सर्व संचालक आणि सदस्य यांच्या उपस्थितीत नगरसेविका व संस्थेच्या महिला विभाग सदस्य सौ. सुजाता बागकर यांच्या हस्ते या बाकड्यांचा लोकार्पण सोहळा नूकताच पार पडला. Unique Gift by Arekar Foundation
यावेळी लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान चे कार्याध्यक्ष श्री. साहिल आरेकर, महिला विभाग प्रमुख सौ. स्वातीताई कचरेकर, श्री. प्रसन्न कनगुटकर, श्री. श्रीधर बागकर, श्री. तुषार सुर्वे, श्री. निखिल बेंडल, श्री. रवींद्र वराडकर, श्री.शैलेश वरंडे, श्री. मंगेश घोरपडे, श्री.राजेंद्र वराडकर, श्री. संदेश होळंब आदी उपस्थित होते. Unique Gift by Arekar Foundation
