• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अंतरा पालशेतकरला एकलव्य पुरस्काराने सन्मानित

by Manoj Bavdhankar
October 21, 2022
in Guhagar
19 1
0
Eklavya Award to Antara Palshetkar
38
SHARES
109
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 21 :  अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा गुहागर यांच्या वतीने एकलव्य विद्यार्थी पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदुर नवानगर शाळेतील इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी अंतरा तुषार पालशेतकर हिला जिल्हाध्यक्ष प्रवीण काटकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.  सत्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, रोख पारितोषिक, प्रशस्तीपत्रक असे होते. Eklavya Award to Antara Palshetkar

सुस्वाभावी व मनमिळावू वृत्तीची विद्यार्थीनी अंतरा पालशेतकर ही जिल्हा परिषद शाळा वेलदूर नवनगर शाळेमध्ये इयत्ता सातवी मध्ये शिकत असून शालेय उपक्रमामध्ये सहभाग असतो. विज्ञान प्रदर्शन, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा यामध्ये तिचा सक्रिय सहभाग असतो. एकलव्य पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल तिचे माजी सरपंच नंदकुमार रोहिलकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सानिया रोहीलकर, विशाखा नाटेकर, ऋतुजा रोहीलकर, ग्रामपंचायत सदस्य मारुती रोहीलकर, शंकर कोळथरकर, देवराम भोसले, सलीम सरनोबत, मुख्याध्यापक मनोज पाटील, सत्वशीला जगदाळे, पल्लवी घुले, अंजली मुद्दमवार, निलोफर शेख, सुवर्णा कोळथरकर आदींनी अभिनंदन केले. Eklavya Award to Antara Palshetkar

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून समितीचे तालुकाध्यक्ष अरविंद पालकर, संघाचे तालुकाध्यक्ष दीपक साबळे, केंद्रप्रमुख श्रीकांत वेल्हाळ, केंद्रप्रमुख अशोक गावणकर , केंद्रप्रमुख नामदेव लोहकरे, केंद्रप्रमुख कैलास शार्दुल, बाबासाहेब राशिनकर, अखिलचे तालुकाध्यक्ष डॉ. मनोज पाटील, जिल्हा सरचिटणीस संतोष देवघरकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य अभय गुजर, तालुका सरचिटणीस संजय जंगम, सुरेश बोले, अशोक पावसकर, चंद्रकांत पागडे, इमाम पाटील, मनोज शिंदे, जिल्हा प्रतिनिधी माधवी पाटील, प्रकाश गोरे, प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक सुनील रामाने, तंत्रस्नेही शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रदीप पडवळ, आदर्श शिक्षिका ममता विचारे आदी उपस्थित होते. Eklavya Award to Antara Palshetkar

Tags: Eklavya Award to Antara PalshetkarGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share15SendTweet10
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.