खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या आणखी ५ शाखा
रत्नागिरी, ता. 20 : खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था रत्नागिरी जिल्हा या संस्थेच्या पाच शाखांच्या विस्ताराला सहकार खात्याने मंजुरी दिली आहे. राज्यात अवघ्या तीन वर्षात पाच शाखांना मंजुरी मिळवणारी ही एकमेव पतसंस्था आहे. खारवी समाज विकास नागरी पतसंस्थेच्या इतिहासातील सोनेरी क्षण आहे. Approval for expansion of Kharvi Samaj Credit Union

सहकार क्षेत्रातील जुजबी माहिती असताना २० नोव्हेंबर २०१८ रोजी खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था जिल्हा रत्नागिरी स्थापन झाली. २७ जानेवारी २०१९ प्रधान कार्यालयाच्या रूपाने रत्नागिरी येथे प्रत्यक्ष व्यवसायाला प्रारंभ झाला. सभासदांची विश्वासाहर्ता वाढवून ग्राहकांचा आर्थिक विकास साधत प्रगतीपथावर मार्गक्रमण करणारी पतसंस्था अल्पावधीतच नावारूपाला आली. पहिल्या दिवसापासूनच शंभर प्रतिशत संगणकीय प्रणालीद्वारे काम करत एसएमएस सुविधेचा प्रारंभ केला. आज संस्थेत १००% सायबर सेक्युरिटी सुविधा आहे. सलग ४ वर्षे ‘अ’ वर्ग प्राप्त करून जनमानसात एक वेगळी प्रतिमा पतसंसंस्थेने निर्माण केली आहे. Approval for expansion of Kharvi Samaj Credit Union
आज सलग ४ वर्षे संस्था चढत्या क्रमाने नफ्यात आहे. पहिल्या वर्षांपासून सभासदांना लाभांश देणाच्या विक्रम संस्थेने केला आहे. थकबाकीचे प्रमाण सलग ४ वर्षे अत्यल्प ठेवत, विक्रमी वसुली ची परंपरा कायम ठेवण्यात संस्था यशस्वी झालेली आहे. ठेवी व कर्ज यांचे आदर्श प्रमाण राखत ठेवींवर जास्तीत जास्त व्याज देणारी पतसंस्था, सोनेतारण कर्जव्यवहारात १००% वसुली करत आहे. CR/AR. चे कमीत कमी आवश्यक असलेले ९% चे प्रमाण आज १९.५४ % पर्यंत आणण्यात संस्था यशस्वी झाली आहे. कुशल व उच्च विद्या विभूषित कर्मचारी वर्ग, १४ जणांचे संचालक मंडळ व १३ जणांचे समन्वय समिती सदस्यांच्या आधारावरच ग्राहकांना नियोजनबद्ध , नम्र व जलद सेवा देत आहे. शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणांचा त्यांचे अंमलबजावणीसाठी नियोजनबद्ध प्रयत्न करत आहे. अल्पावधीतच संस्थेचा आर्थिक सक्षमतेचा पाया भक्कम झाला आहे. आर्थिक स्पर्धेच्या या युगात अर्थकारणाची गती राखण्याचं आव्हान संस्था पेलत आहे. आर्थिक शिस्त ,विश्वासार्हता, ग्राहक सेवा या गोष्टी जपत, आपल्या अर्थकारणात व्यावसायिकता आणि सहकार तत्त्व यांची सांगड घालून विस्ताराच्या दिशेने मार्गाक्रमण करताना सर्व सभासदांमध्ये आज विश्वास उत्पन्न झाला आहे. Approval for expansion of Kharvi Samaj Credit Union
या संस्थेने ४ वर्षात सर्वप्रकारचे आर्थिक निकष पूर्ण करीत व आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. चा राज्यस्तरीय दिपस्तंभ पुरस्कार २०२२ संस्थेला प्राप्त झाला आहे. कोकण विभागातून गट क्र १ मध्ये १ ते १० कोटी ठेवी असणा-या गटांमध्ये प्रथम क्रमांकाचा सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील अल्पावधीतच मिळाला. संस्थेच्या या विस्तारात सर्व प्रशासकीय अधिकारी, संचालक मंडळ, समन्वय समिती सदस्य , सभासद यांचे उत्तम सहकार्य लाभल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष संतोष पावरी यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. Approval for expansion of Kharvi Samaj Credit Union
