तळवली हायस्कुलमधील गरीब व गरजूंना पुणे सेवार्थ फाऊंडेशनचा मदतीचा हात
गुहागर, ता. 17 : तालुक्यातील न्यु इंग्लिश स्कुल व ज्युनिअर कॉलेज तळवली येथे सेवार्थ फाऊंडेशन पुणेने गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे. शाळेतील सुमारे 59 गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले. Aid to Talvali High School by Sevarth Foundation

समाजात वावरताना आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो. हाच उद्देश ठेऊन सेवार्थ फाऊंडेशन पुणे या संस्थेने नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याचे दाखवून दिले आहे. तब्बल 1 लाख 28 हजार रुपयांची मदत केली. यामध्ये गरजू व गरीब विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप तसेच या विद्यार्थ्यांची शालेय फी अशी भरघोस मदत दिली आहे. Aid to Talvali High School by Sevarth Foundation
या कार्यक्रमासाठी सेवार्थ फाऊंडेशन पुणेच्या अध्यक्षा संपदा कुंटे, स्वयंसेवक संदीप चव्हाण, योगेश पाटील, शिवाजी सकपाळ, विनोद पाटील, सौ. देशपांडे, पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे संचालक रत्नाकर आग्रे, तळवली गटविकास मंडळाचे अध्यक्ष विनायक मुळे, न्यु इंग्लिश स्कुल व ज्युनिअर कॉलेज तळवलीचे प्राचार्य बी. ए. थरकार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रदीप चव्हाण, माजी प्राचार्य एस एन शिर्के, पी. ए. शिर्के, तळवली तंटामुक्त समिती अध्यक्ष व प्रा.अमोल जडयाल, आशिष कारेकर, बाळकृष्ण कांबळे आदीसह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेवार्थच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. Aid to Talvali High School by Sevarth Foundation
