• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
24 August 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अंजनवेल, वेलदूरमध्ये भाजपच्या प्रस्थापितांना धक्का

by Mayuresh Patnakar
October 17, 2022
in Politics
22 0
0
Dominance of MLA Jadhav

गुहागर : अंजनवेल ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयी उमेदवार

43
SHARES
123
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आमदार जाधव यांचे वर्चस्व, मविआ पुरस्कृत गाव पॅनेल विजयी

गुहागर, ता. 17 : अंजनवेल ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये 10 वर्ष सरपंच असलेल्या यशवंत बाईत यांच्या गाव पॅनेलचा पूर्णपणे पराभव झाला. शिवसेना पुरस्कृत गाव पॅनेलचे सरपंच पदासह 9 ग्रामपंचायत सदस्य निवडून आले. तर वेलदूरमध्ये भाजपचे वर्चस्व असलेल्या ग्रामपंचायतीवर देखील शिवसेना पुरस्कृत गाव पॅनेलचा सरपंच आणि प्रभाग ३ मधील ग्रामपंचायत सदस्य निवडून आला. प्रस्थापित भाजपसाठी हा मोठा धक्का आहे. तर विभाजन झाल्यानंतर मतदारसंघावर आपली पकड असल्याचे शिवसेना नेते व आमदार भास्कर जाधव यांनी दाखवून दिले आहे. Dominance of MLA Jadhav

गुहागर तालुक्यातील 5 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी वेळंब आणि परचुरी या दोन्ही ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासह ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. चिंद्रावळे ग्रा. पं. मध्ये सरपंच पदासह नऊ पैकी आठ जागा बिनविरोध झाल्या. प्रभाग क्र. 1 मधील सर्वसाधारणसाठी झालेल्या निवडणुकीत विवेक रामचंद्र बारस्कर (291) यांनी किरण देवजी आंबेकर (71) यांचा पराभव केला. Dominance of MLA Jadhav

Dominance of MLA Jadhav
गुहागर : वेलदूर ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयी उमेदवार

वेलदूर ग्रामपंचायत मविआच्या ताब्यात

वेलदूर ग्रामपंचायतीमध्ये 11 सदस्यांपैकी भाजप 5 व  महाविकास आघाडी 5 असे 10 ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले. वेलदुर ग्रुप ग्रामपंचायतीमधील नवानगर या गावातील 1 ग्रामपंचायत सदस्यासाठी आणि सरपंच पदासाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत मविआ पुरस्कृत दिव्या सुमित वणकर 803 मतांनी विजयी झाल्या. त्यांनी भाजप पुरस्कृत सारिका सचिन दाभोळकर (612)  यांचा 191 मतांनी पराभव केला. तर प्रभाग 3 मध्ये नामाप्रमध्ये निलेश विजय धामणस्कर (163) यांनी प्रकाश शाम धामणस्कर (133) यांचा पराभव केला. Dominance of MLA Jadhav

अंजनवेल ग्रामपंचायतीवर शिवसेना पुरस्कृत पॅनेल

गेली 10 वर्ष सरपंच यशवंत बाईत यांच्या नेतृत्त्वाखाली अंजनवेल ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व होते. यावेळी महिला आरक्षण पडल्याने यशवंत बाईत यांना सरपंच पद मिळणार नाही हे निश्चित झाले. त्यामुळे भाजपने यशवंत बाईत यांच्या नेतृत्त्वामध्ये सर्वपक्षीय आघाडी केली. तर आमदार जाधव यांनी शिवसेना (ठाकरे गट) पुरस्कृत पॅनेल उभे केले. या पॅनेलने बाईत पॅनेलचा संपूर्ण पराभव केला. केवळ प्रभाग 1 मधुन यशवंत बाईत ग्रामपंचायत सदस्य म्हणून विजयी झाले. Dominance of MLA Jadhav

Dominance of MLA Jadhav
निकालाच्या प्रतिक्षेत असलेले ग्रामस्थ

सरपंच पदाच्या निवडणुकीत सोनल मोरे (937) यांनी बाईत गटाच्या अनामिक खडपेकर (773) यांना 164 मतांनी पराभव केला. प्रभाग 2 मधुन माजी पंचायत समिती सदस्या बागकर यांचे पती मंगेश बागकर (142) यांचा समद युनुस आचरेकर (357) यांनी 210 मतांनी पराभव केला. प्रभाग 2 (सर्वसाधारण स्त्री) मध्ये सानिका नरवणकर (329) आणि सुवर्णा सैतवडेकर (304) प्रभाग 3 (सर्वसाधारण स्त्री) फौजिया महेबुब पठाण (197), प्रभाग 3 (सर्वसाधारण) बाळकृष्ण राजाराम सुर्वे (228), प्रभाग 4 (नामाप्र) योगेश धामणस्कर (335), प्रभाग 4 (सर्वसाधारण) नंदकुमार खेतले (314) आणि प्रभाग 4 (सर्वसाधारण स्त्री) वहिदा अ. रहिमान खतिब (344) हे शिवसेना पुरस्कृत ग्रामपंचायत सदस्य विजयी झाले. Dominance of MLA Jadhav

वेळंब आणि परचुरी ग्रामपंचायत निवडणुकीच्या बातम्या वाचण्यासाठी खालील बातम्यांवर क्लिक करा.
वेळंब ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध
परचुरी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध

Tags: Dominance of MLA JadhavGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share17SendTweet11
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.