गुहागर, ता.12 : श्री.दे.गो.कृ.मा.विद्यामंदिर, स.सु.पाटील शास्त्र, श्री.म.ज.भोसले वाणिज्य, विष्णुपंत पवार कला कनिष्ठ महाविद्यालय, गुहागर. या प्रशाळेचे माजी मुख्याध्यापक अशोक वामन आठवले यांनी पंच्याहत्तरी निमित्त केलेल्या ग्रंथ तुलेतून प्राप्त ग्रंथ विद्यालयातील ग्र॔थालयास देण्यात आले. त्यांच्या या स्तुत्य पावलाचे कौतुक करत शाळा समिती अध्यक्ष दिपक कनगुटकर यांनी त्यांना भावी निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. Book gift to Guhagar school

अशोक आठवले सर हे याच शाळेतून निवृत्त झाले आहेत. तरीही संस्था, शाळा व विद्यार्थी यांच्यावर नितांत श्रध्दा आहे. वयाची पंचाहत्तर वर्षे पूर्ण होत असताना करण्यात आलेल्या ग्रंथ तूलेतून प्राप्त ग्रंथ त्यांनी स्पर्धात्मक युगात; वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक ग्रंथ, संदर्भ पुस्तके सर्वच उपलब्ध होतील असे नाही हे लक्षात घेत त्यांनी उचलेल्या ह्या स्तुत्य पावलाचे कौतुक करत शाळा समिती अध्यक्ष दिपक कनगुटकर यांनी त्यांना भावी निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. Book gift to Guhagar school

ह्यावेळी शाळा समिती अध्यक्ष दीपक कनगुटकर आणि अशोक आठवले सर यांचे स्वागत करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी आडेकर सर यांनी वृक्ष भेट देत निसर्गाप्रती एक नवीन संदेश दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक सुधाकर कांबळे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक प्रा.विलास कोरके सर, पर्यवेक्षिका सोनाली हळदणकर मॅडम, मधुकर गंगावणे सर, संतोष मोहिते सर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. Book gift to Guhagar school


