सैन्य दलातील अधिकारी, सिने कलाकार, शिक्षण अधिकारी, राजकीय नेते यांच्या उपस्थितीत वितरित
गुहागर, ता.10 : तालुक्यातील ग्रामपंचायत उमराठचे विद्यमान सरपंच जनार्दन पांडुरंग आंबेकर हे फेब्रुवारी २०२१ पासून कार्यरत आहेत. ग्रामपंचायत कार्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असल्याबद्दल त्यांना आदर्श सरपंच गौरव पुरस्कार देण्यात आला. सन्मान चिन्ह, अभिनंदन पत्र, सन्मान पत्र, म्हैसूर फेटा व चंदनाचा हार असे या पुरस्काराचे स्वरूप होते. Adarsh Sarpanch Award to Aambekar

या पुरस्काराचे वितरण शनिवार दि. ८ ऑक्टोबर रोजी धर्मनाथ भवन, अशोक नगर, गँगवाडी, बेळगाव या ठिकाणी झाले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा भारतीय सैन्य दलातील अधिकारी, सिने कलाकार, शिक्षण अधिकारी, राजकीय नेते यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरित करण्यात आला. हा National Rural Development Foundation (Reg.) Belagavi Health & Nature Development Society, Belgavi या कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा तीन राज्यात कार्यरत असणाऱ्या संस्थेकडून देण्यात येतो. Adarsh Sarpanch Award to Aambekar
श्री. आंबेकर यांनी उमराठच्या ग्रामसभेमध्ये विधवा अनिष्ट प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक सकारात्मक निर्णय घेतला. त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी स्वतःच्या कुटूंबापासून काकांच्या अंत्यविधीच्या सोपस्कार प्रसंगापासून ग्रामस्थांच्या सहकार्याने गावात विधवा अनिष्ट प्रथा बंद करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षात हर घर तिरंगा अभियानात ग्रामपंचायत कार्यालयात विधवा महिलेचा सन्मान करून त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून महिलांना प्राधान्य व महिलांचे सक्षमीकरण करण्यात त्यांचे योगदान आहे. त्यांनी गावातील विकास कामांबरोबरच शासनाच्या विविध सोयी-सुविधा/ योजनांची माहिती देणे. वैद्यकीय आरोग्य शिबीरे, आधुनिक शेती संबंधित कृषी अधिकाऱ्यांची शिबीरे व चर्चासत्रे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची शिबीरे, तहसिलदार आणि तलाठी कार्यालयाशी संबंधित शिबीरे, पोस्ट खात्याशी संबंधित विविध योजनांची माहिती शिबीरे व चर्चासत्र आयोजित करून ग्रामस्थांना वेळोवेळी मार्गदर्शन आणि त्याचा जास्तीत जास्त लाभ ग्रामस्थांनी कसा घ्यावा. विधवा व निराधार महिलांना पेन्शन मिळवून देणे, गावातील शाळेत होणाऱ्या विविध कार्यक्रमांत प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देणे यावर तसेच इतर लोकोपयोगी कामे आदींची दाखल घेऊन श्री. आंबेकर यांना National Rural Development Foundation (Reg.) Belagavi Health & Nature Development Society, Belgavi या कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा तीन राज्यात कार्यरत असणाऱ्या संस्थेकडून आंतरराज्य आदर्श सरपंच गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. Adarsh Sarpanch Award to Aambekar
पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे. गावातील ग्रामस्थांचा सदैव सक्रिय सहभाग व सहकार्यामुळेच लोकोपयोगी निर्णय घेता येतात. त्यामुळे या पुरस्काराचे संपुर्ण श्रेय ग्रामस्थाचे आहे, असेही सरपंच जनार्दन आंबेकर यांनी सांगितले. सदर गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांच्याबरोबर उमराठ ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुरज घाडे, कर्मचारी असिस्टंट नितीन गावणंग व रोजगार सेवक प्रशांत कदम उपस्थित होते. Adarsh Sarpanch Award to Aambekar
