गुहागर, ता.10 : हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था कराड ओगलेवाडी यांच्या वतीने राज्यस्तरीय ८ वा कोकण गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आला. हा गौरव कार्यक्रम लक्ष्मीबाई बाळासाहेब माटे सभागृह चिपळूण येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री. उदय वसंत रावणग यांना “अपंग सेवा पुरस्कार” प्रदान करण्यात आला. State level award to Ravanag

उदय रावणग हे स्वत: दिव्यांग असून ते इतर सर्व प्रकारच्या दिव्यांगांसाठी सतत कार्यरत आहेत. त्यांनी तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय सर्व प्रकारच्या दिव्यांगांसाठी अनेक उपयुक्त उपक्रम राबविले आहेत व राबवीत आहेत. दिव्यागांना दिव्यांगत्वाचे सिव्हील सर्जन रत्नागिरीचे प्रमाणपत्र काढून देणे, अंत्योदय योजनेचा लाभ मिळवून देणे, संजय गांधी पेन्शन योजनेचा लाभ मिळवून देणे, विविध कोर्सेसेच्या कार्यशाळा घेणे, दिव्यांग विद्यार्थी व दिव्यांगांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य मिळवून देणे, विविध क्रीडा स्पर्धा घेणे इत्यादी अनेक बाबींसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. श्री. उदय वसंत रावणग यांना यापूर्वी ही विविध क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या या सन्मानाबद्दल सर्वच क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचे वतीनेही त्यांचे सर्व दिव्यांग सभासद यांनी अभिनंदन केले आहे. State level award to Ravanag
या कार्यक्रमासाठी डॉ. विजय बाळासाहेब माटे, चिपळूण, रत्नागिरीचे सरकारी वकील श्री. विध्याधर जोग, एक्सल कंपनी लोटेचे सिनिअर व्यवस्थापक श्री. सुरेश पाठणकर, डॉ. चंद्रकांत भागवत, डॉ. हाफिज, संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील फडतरे, कार्याध्यक्ष श्री. संजय अहीर आदि मान्यवर व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. State level award to Ravanag
