राज्यपालांच्या हस्ते गौरव, एशिया टुडे संस्थेने केली निवड
गुहागर, ता. 8 : तालुक्यातील वेळणेश्वरच्या महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाला (Maharshi parshuram college of engineering) एशिया टुडे (Asia today) ने Most Admired Engineering College In Maharashtra (महाराष्ट्रातील सर्वात प्रशंसनीय अभियांत्रिकी महाविद्यालय) या पुरस्काराने गौरविले. हा पुरस्कार राज्यपाल श्री. भगतसिंग कोशियारी यांच्या हस्ते विद्या प्रसारक मंडळाच्या संचालिका डॉ. कीर्ती आगाशे यांनी स्वीकारला. Velneshwar College was chosen by Asia Today


7 आँक्टोबरला मुंबईत एशिया टुडे या संस्थेच्या Pride Of Nation Awards 2022 या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या समारंभाला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशियारी, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री श्री. रामदास आठवले आणि विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण भागात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन अभियांत्रिकी शिक्षणाची संधी विद्यार्थ्यांना दिल्याबद्दल महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाची (Maharshi parshuram college of engineering) निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली, असल्याचे एशिया टुडे (Asia today) ने सांगितले. Velneshwar College was chosen by Asia Today
रत्नागिरी जिल्ह्यात उच्च शिक्षणाच्या सोयी-सुवीधांची कमतरता लक्षात घेऊन विद्या प्रसारक मंडळ (ठाणे) यांनी २०१० साली वेळणेश्वर सारख्या ग्रामीण भागात महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाची पायाभरणी केली. २०१२ साली वेळणेश्वर येथे अभियांत्रिकी महाविद्यालय प्रत्यक्ष सुरू झाले. अत्यंत कमी कालावधीत नॅक चे मानांकन मिळवणारे मुंबई विद्यापीठाअंतर्गत सर्वात तरुण महाविद्यालय म्हणजे महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर. Velneshwar College was chosen by Asia Today
विद्या प्रसारक मंडळाने कोविड महामारीमुळे उद्भवलेली भीषण परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या मोहिमेला प्रतिसाद म्हणून मुलींसाठी महाविद्यालयात ‘कोकणकन्या शिष्यवृत्ती योजना’ 2020 पासून सुरू केली. तसेच विद्या प्रसारक मंडळाच्या मदतीने प्रथम आणि थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एक वर्षाचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात आले. Velneshwar College was chosen by Asia Today
भाभा अणुसंशोधन केंद्रातील प्रथितयश निवृत्त वैज्ञानिक महाविद्यालयात येऊन नियमित केलेले मार्गदर्शन इत्यादी योजना विद्यार्थ्यासाठी महाविद्यालय राबवत आहे. आभासी प्रयोगशाळेमधुन अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान माहिती व्हावे यासाठी काँलेज आँफ इंजिनिअरींग पूणे, आय.आय.टी., अशा नामवंत संस्थांबरोबर करार केले आहेत. इस्त्रो, भेल, सारख्या मोठ्या प्रकल्पात औद्योगिक भेटीसाठी विद्यार्थ्यांना नेले जाते. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवरील विज्ञान प्रतिकृती स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. या सर्व उपक्रमांतून विद्यार्थ्यांची नवनिर्माण क्षमता वाढविणे, उत्तम अभियंता बनविणे, उत्तम नागरिक बनविण्यासाठी महाविद्यालय सातत्याने प्रयत्न करते. यामुळेच हे महाविद्यालय पुरस्कारासाठी पात्र ठरले. अशी माहिती संस्था व महाविद्यालय समन्वयक ऋषिकेश गोखले यांनी दिली. Velneshwar College was chosen by Asia Today
महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बातम्या वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिंक करा.