• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अभ्यंकर विद्यामंदिरात शारदोत्सवानिमित्त कार्यक्रम

by Guhagar News
October 8, 2022
in Ratnagiri
19 0
0
Sarada Utsav at Abhyankar Vidyamandir
37
SHARES
106
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता.08 : परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरात उत्साहात शारदोत्सव साजरा करण्यात आला. घटस्थापनेला देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली. विद्यार्थ्यांनी दररोज देवीची आरती केली. तसेच २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात हभप किरण जोशी यांनी विद्यार्थ्यांना कीर्तनातून गुरुची महती सांगितली. Sarada Utsav at Abhyankar Vidyamandir

शारदोत्सवात इयत्ता पहिली दुसरीच्या मुलांसाठी माजी मुख्याध्यापिका सौ. अनुराधा जोशी माजी शिक्षिका श्रीमती सुधा घाणेकर व सचिन काळे तर इयत्ता तिसरी चौथीसाठी अॅड. मानसी डिंगणकर व फाटक हायस्कूलच्या माजी शिक्षिका श्रीमती वृंदा मुसळे यांनी गोष्टी सांगितल्या.  सौ. अनुराधा जोशी यांनी जादूची गोष्ट सांगितली. यावेळी जादूच्या मंत्रांचा मुलांनी प्रत्यक्ष मंत्र म्हणत आनंद घेतला. अॅड. मानसी डिंगणकर यांनी राष्ट्रप्रेम, मातृप्रेम, मूल्यसंस्कार या विविध विषयावर गोष्टी सांगितल्या. विद्यार्थ्यांनी गरबा नृत्याचा मनसोक्त आनंद लुटला.  सचिन काळे यांनी मुलांना सोप्या पद्धतीने चित्र कसे काढायचे याचे मार्गदर्शन केले. Sarada Utsav at Abhyankar Vidyamandir

Sarada Utsav at Abhyankar Vidyamandir

तसेच २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. हा दिवस बालसभेने साजरा केला. बालसभेचे नियोजन इयत्ता चौथीच्या विद्यार्थी व शिक्षकांनी केले. बालसभेची सुरवात ईशस्तवनाने झाली. बालसभेच्या अध्यक्षस्थानी अर्णव जोगळेकर होता. या सभेचे प्रास्ताविक अर्णव पटवर्धन याने केले. सूत्रसंचालन निधी जोशीने केले. महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त आयोजित आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे बक्षिस वितरण करण्यात आले. बक्षिसप्राप्त विद्यार्थ्यांनी भाषणे केली. बालसभेच्या निमित्ताने मुख्याध्यापक विनोद नारकर यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचे विचार जीवनात प्रत्यक्ष कृतीत आणले पाहिजेत, असा संदेश विद्यार्थ्यांना दिला. स्वरा साळुंके हिने सर्वांचे आभार मानले. मुख्याध्यापक श्री. नारकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालकांच्या सहकार्याने शारदोत्सवाची उत्साहात सांगता झाली. Sarada Utsav at Abhyankar Vidyamandir 

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarSarada Utsav at Abhyankar VidyamandirUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share15SendTweet9
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.