• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आरेकर इन्स्टिट्यूटमधील 29 विद्यार्थ्यांना नोकरी

by Mayuresh Patnakar
October 7, 2022
in Ratnagiri
25 0
0
Job for students from Arekar Institute

आरेकर इन्स्टिट्यूटमध्ये मुलाखती देताना विद्यार्थी

49
SHARES
139
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चिपळूणात येवून घेतल्या मुलाखती

गुहागर, ता. 07 :  छोटया छोट्या कौशल्य विकास आधारित अभ्यासक्रमाद्वारे 40 हून अधिक युवक युवतींना नोकरी देण्यात आरेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट चिपळूण (Arekar Institute of Management Chiplun) यशस्वी झाली आहे. आज देखील या संस्थेमध्ये येवून एका कंपनीच्या अधिकाऱ्यांनी 35 विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यापैकी 29 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. Job for students from Arekar Institute

गेल्या दशकात देशातील सेवा क्षेत्र रोजगार निर्मितीचे मोठे केंद्र म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. सेवा क्षेत्रामध्ये अभियंता, डॉक्टर आदी उच्च शिक्षणापेक्षा कला, वाणिज्य, शास्त्र शाखेतील पदवीधरांना कौशल्यावर आधारीत नोकऱ्या चटकन मिळतात. या कौशल्यामध्ये तुम्हाला किती भाषांमध्ये चांगला संवाद साधता येतो. तुम्ही समोरच्या व्यक्तीशी किती नम्रपणे बोलु शकता. तुम्हाला संगणकावर सहजतेने काम करता येते का. तुम्ही नव्या मोबाईल तंत्रज्ञानाशी चटकन जुळवून घेता का. मोठी रुग्णालये, हॉटेल, कार्पोरेट ऑफिसमध्ये  कारकुनी कामाव्यतिरिक्त अन्य कामे आवडीने करण्याची तयारी आहे का. अशा विविध बाबींचा समावेश आहे. अशी कौशल्ये आपल्याकडे असतील तर आपल्याला आजही सहज रोजगार उपलब्ध आहे. Job for students from Arekar Institute

Job for students from Arekar Institute
आरेकर इन्स्टिट्यूटमध्ये मुलाखती देताना विद्यार्थी

सेवा क्षेत्राची हीच गरज ओळखून आरेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट चिपळूण या संस्थेने Front office exicutive,  Guest house caretaker,   Customer Care Executive, Hospitality, सुरक्षा रक्षक आदी छोटे छोटे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकविण्यास सुरवात केली. वर्षभरातच या संस्थेकडे अनेक मोठ्या कंपन्या कौशल्य विकसीत मनुष्यबळाची मागणी करु लागल्या. त्यासाठी या कंपन्या थेट चिपळूणला आरेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये येवून मुलाखती घेऊ लागले. त्यातून दोन वर्षात 40 हून अधिक विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली. Job for students from Arekar Institute

सप्टेंबर 2022 मध्ये अशाच प्रकारे Waiz Telecalling Services या कंपनीने Customer Care Executive ची नेमणूक करण्याकरीता साहील आरेकर यांच्या संस्थेला भेट दिली. Customer Care Executive अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या 35 युवक युवतींच्या मुलाखती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घेतल्या.  या मुलाखतीमधुन Waiz Telecalling Services या कंपनीने 29 विद्यार्थ्यांची निवड नोकरीसाठी केली आहे. Job for students from Arekar Institute

Job for students from Arekar Institute
आरेकर इन्स्टिट्यूटमध्ये मुलाखती देताना विद्यार्थी

याबाबत बोलताना आरेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे सर्वेसर्वा साहिल आरेकर म्हणाले की, आमच्याकडून शिकुन गेलेल्या 100 हून अधिक विद्यार्थ्यांना नोकरी देण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. मात्र सुरवातीला अशा विद्यार्थ्यांची नोंद आम्ही ठेवली नाही. आज सेवा क्षेत्रातील नामांकित कंपन्याना कौशल्य विकास आधारित मनुष्यबळाची आवश्यकता आहे. हे छोटे कोर्स कमी फी मध्ये उपलब्ध असतात. मात्र त्यातून नोकरीच्या अनेक संधी निर्माण होतात. त्यामुळे कोकणातील विद्यार्थ्यांनी पदवी मिळाल्यानंतर घरी न बसता असे छोटे अभ्यासक्रम निवडून कौशल्य विकसीत करावे. आमच्या संस्थेमधील विविध अभ्यासक्रमांची माहिती मिळविण्यासाठी 8483051399 / 8485851399 या क्रमांकांवर संपर्क साधावा. Job for students from Arekar Institute

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiJob for students from Aarekar InstituteLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share20SendTweet12
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.