• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 December 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

दसरा मेळाव्यात काय म्हणाले मा. एकनाथ शिंदे

by Guhagar News
October 6, 2022
in Maharashtra
17 0
0
Dasara Melawa Shivaji Park
34
SHARES
96
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे…

(Important points of Eknath Shinde’s speech at BKC)

मुंबई, ता.06 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात फक्त उद्धव ठाकरे यांना टीकेचे लक्ष केले. आम्ही गद्दार नाही तर बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणारे तुम्हीच खरे गद्दार असल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे. Dasara Melawa Shivaji Park
शिवसेना प्रमुखांच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या विचारांचे पाईक असलेल्या शिवसैनिकांना माझा नमस्कार. या विराट जनसमुदायला मी विनम्र अभिवादन करतो. आपल्या समोर मी नतमस्तक होतो. या जनसमुदायाने सिद्ध केलंय की शिवसेना कुणाची.
आम्ही जे केलं ते राज्याच्या हितासाठी. ही शिवसेना ना उद्धव ठाकरेंची, ना एकनाथ शिंदेंची. ही शिवसेना शिवसैनिकांची. ही शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची.
सत्तेसाठी तुम्ही वडिलांचे विचार विकले. होय गद्दारी झालेली आहे. पण गद्दारी ही २०१९ ला झाली. बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी झाली. जनतेशी गद्दारी झाली.
तुमची गद्दारी जनतेला कळली, म्हणून तर एवढा जनसमुदाय इथे लोटला आहे. आता जनतेने ठरवलं आहे. गद्दारांना साथ द्यायची नाही.
आम्ही निर्णय घेताना आनंदाने घेतला नाही, आम्हालाही वाईट वाटलं; आम्हाला गद्दार म्हणण्यापेक्षा तुम्ही आत्मपरीक्षण करा.
मीच ग्रामीण भागातील आमदारांना भेटायचो, बाकी कुणीही नाही, पराभूत उमेदवारांना राष्ट्रवादी-काँग्रेस ताकत द्यायचे,मी हे ठाकरेंना सांगितलं
आम्ही केलेली गद्दारी केली नाही. हा गदर आहे. बाळासाहेबांच्या विचारांची क्रांती आहे.
आम्हाला बाप चोरणारी टोळी म्हणता, तुम्ही बापाचे विचार विकले, बापालाच विकण्याचा प्रयत्न केला.
ही गर्दी पाहून खरी शिवसेना कुठं आहे याचं उत्तर उभ्या महाराष्ट्रालाच नाही तर भारताला मिळालं आहे.
कोविड-कोविड करुन तुम्ही सर्वांना घरात बसवलं, तुम्ही मंदिरं बंद केली, दुकानं बंद केली.


राज्यातही PFI ला ठेचलं जाईल, PFI बाबत पंतप्रधान मोदी, अमित शाहांची भूमिका योग्य आहे.
आरएसएसवर बंदीची मागणी हास्यास्पद, आरएसएसचं राष्ट्रउभारणीत महत्वाचं योगदान.
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी PFI वर घेतलेले निर्णय योग्य आहेत. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत केलं आहे.
जरा विचार करा: तुमचे बंधू राज ठाकरे तुमच्या सोबत राहिले नाहीत. नारायण राणे सोडून गेले. स्मिता ठाकरे वाहिनी, निहार ठाकरे इथेच बसलेत. का बसलेत? आता तरी याचा विचार करा. Dasara Melawa Shivaji Park

Dasara Melawa Shivaji Park


तुम्हांला मुख्यमंत्री म्हणून ५ वर्ष पूर्ण करायची होती. शिवसेनेचे होत असलेले पानिपत तुम्ही पाहत बसला होतात.
बाळासाहेब आणि पवारांची दोस्ती होती. पण राजकारणात बाळासाहेबांनी कधी दोस्ती मध्ये आणली नाही.
एकीकडे शिवसैनिकांचे खच्चीकरण होत होतं आणि आमचे पक्षप्रमुख धृतराष्ट्राची भूमिका निभावत होते.
2.5 वर्ष का गप्पं बसलो? आमच्या देवाचं अंश तुम्ही म्हणून शांत बसलो.
आम्हाला रिक्षावाला, पानवाला म्हणणारे आता कुठे आहेत? चहावाला या देशाचा पंतप्रधान झाला. तुम्ही त्यांची खिल्ली उडवली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुम्ही खिल्ली उडवता. त्यांनी जगामध्ये आपल्या देशाची वेगळी ओळख निर्माण केलीय. जगातल्या लोकांना त्यांनी भुरळ घातली आहे.
काँग्रेस पक्ष आहे पण त्याला अध्यक्ष नाही, पंतप्रधानांची टिंगल करणाऱ्यांचं काय झालं?
हे शिवसैनिक आहेत म्हणुन मी शिवसेनाप्रमु्ख आहे असं बाळसाहेब म्हणायचे.
आता तुमच्याकडचे लाखो शिवसैनिक गेले. आमदार गेले, खासदार गेले. तरी मी पणा कायम आहे. अजूनही तुमचे डोळे उघडत नाहीत, हे दुर्देव आहे महाराष्ट्राचं.
तुमचं work from home आणि आमचं work without home

Dasara Melawa Shivaji Park


उद्धव ठाकरेंनी वर्क फॉर्म होम केलं, आम्ही वर्क विदाऊट होम केलं, सातच्या आत घरी जाण्याची शिवसैनिकांची संस्कृती नाही.
जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा स्वतःचा जीव धोक्यात घालून, मी दुसऱ्याला मदत केली. तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घातला नाही.
बाळासाहेब ज्यांना सवंगडी समजत होते. तुम्ही त्यांना घरगडी समजत होतात.
नोकर के साथ क्यू जाते हो. मालिक के साथ आओ. असा फोन थापांना आला होता. अश्या पद्धतीने पक्ष वाढत नाही.
८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण ही बाळासाहेबांची भूमिका घेऊनच काम केलं.
पूराच्या पाण्यातून जाऊन आम्ही पूरग्रस्तांना मदत दिली. असंख्य शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी जीव धोक्यात घालून अनेकांना मदत केली.
अनेक पदाधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. तुम्ही त्याची दखल घेणार की नाही? असं असताना तुम्ही कुणाला सांभाळलं ते सांगा? दाऊद आणि याकुब मेनन चे हस्तक होण्यापेक्षा आम्हाला मोदी शहांचे हस्तक व्हाय़ला केव्हाही आवडेल. Dasara Melawa Shivaji Park

Tags: Dasara Melawa Shivaji ParkGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.