• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
18 June 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मोफत योगा शिबीर

by Mayuresh Patnakar
October 6, 2022
in Health
17 0
0
Free Yoga Camp
33
SHARES
93
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

लायन्स क्लब व महिला पतंजली योग समिती गुहागर यांचे आयोजन

गुहागर, ता.06 : लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी  व महिला पतंजली योग समिती, गुहागर  यांच्या संयुक्त विद्यमाने योग शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर पाच दिवसीय असून मोफत आहे. दुर्गादेवी  देवस्थान वरचापाट, गुहागर येथे दि. ०७ ऑक्टोबर  ते ११ ऑक्टोबर 2022 सायंकाळी  ४.३० ते ६.३० वा. शिबीर घेण्यात येणार आहे. Free Yoga Camp

*या शिबिरामध्ये योग, ध्यान, प्राणायाम घेतले जाणार आहेत. यासाठी महिला पतंजली योग समितीच्या रत्नागिरी जिल्हा प्रभारी सौ. रमाताई जोग व गुहागर तालुका प्रभारी सौ. अनुराधा दामले या मार्गदर्शन करणार आहेत. तसेच शिबिरात सहभागी होणाऱ्या नागरिकांनी आपल्या सोबत  सतरंजी, योगामॅट,  पाण्याची बाटली, वही,  पेन घेऊन यावे.  असे आवाहन लायन्स क्लबचे अध्यक्ष शामकांत खातू, सेक्रेटरी संतोष वरंडे, खजिनदार सचिन मुसळे यांनी केले आहे. शिबीर उद्घाटन कार्यक्रम शुक्रवार दि.  ७ ऑक्टोबर  सायं. ४.१५ वा. दुर्गादेवी देवस्थान येथे करण्यात येणार आहे. तरी लायन्स सदस्य व कुटुंबातील व्यक्ती, बंधु  व भगिनी यांनी उपस्थित राहून सहकार्य करावे. Free Yoga Camp

आजच्या  धकाधकीच्या जीवनात निरामय जीवनशैली करीता योग साधना करणे, प्राणायाम करणे आवश्यक आहे. असे लायन्स क्लबचे अध्यक्ष शामकांत खातू यांनी सांगितले. तरी या योग शिबीरासाठी बहूसंख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे, अशी नम्र विनंती  करण्यात आली आहे. Free Yoga Camp

Free Yoga Camp
Tags: Free Yoga CampGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.