रत्नागिरी, ता.05 : गेले ९ दिवस नवरात्रौत्सव काळात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरी समितीतर्फे आयोजित दुर्गामाता दौडची दसऱ्याच्या दिवशी सकाळी रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्री भगवती देवीच्या दर्शनाने सांगता होणार आहे. Conclusion of Durgamata Mahadaud

या दौडमध्ये रत्नागिरी शहरासह आसपासच्या हातखंबा, निवळी, खेडशी, कारवांचीवाडी, टेंबेपूल, पाली, कसोप, फणसोप, मिऱ्या, नाचणे, कुवारबाव, शिरगाव, पावस आदी भागांतील शिवप्रेमी, राष्ट्रभक्त दौडमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. गेले ९ दिवस दौडला रत्नागिरीकर व ग्रामीण भागातील धारकरी, शिवप्रेमींचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. दुर्गामाता, भारतमाता, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयघोषात हिंदू एकतेचे विराट दर्शन घडवण्यात येणार आहे. तसेच देव, देश, धर्म रक्षणासाठी श्री भगवती देवीला साकडे घालण्यात येणार आहे. Conclusion of Durgamata Mahadaud

आज बुधवारी ५ ऑक्टोबरला सकाळी ५:४५ वाजता शिवतीर्थ, मारुती मंदिर येथे एकत्रीकरण करण्यात आले. त्यानंतर मारुती मंदिर ते राम मंदिर किल्ला येथपर्यंत दुचाकी रॅली काढण्यात येईल. त्यानंतर राम मंदिर, किल्ला ते भगवती देवी मंदिरापर्यंत दौडत जायचे आहे. तरी सर्वांनी श्री दुर्गामाता महादौडीत रत्नागिरीतील विविध भागातून, गावातून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. देव, देश, धर्मप्रेमी ग्रामस्थांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष राकेश नलावडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरी, अध्यक्ष राकेश नलावडे : ९८२२७०६९२३, गौरव सावंत : ७०५७३९५९६९, देवेंद्र झापडेकर : ९९७५१७१४८८, वैभव पांचाळ : ९६७३९४४८१६ यांच्याशी संपर्क साधावा. Conclusion of Durgamata Mahadaud
