गुहागर, ता. 05 : युनिक किड्स प्री स्कूल गुहागरच्या प्रांगणात विद्यार्थी व शिक्षकांसमवेत रास दांडिया खेळ उत्साहात पार पडला. दि. 3 ऑक्टोबर 2022 रोजी शारदीय नवरात्र उत्सवातील अष्टमी निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. Dandiya at Unique Kids Pre School

युनिक किड्स प्री स्कूलामध्ये वर्षभरात येणारे सर्व उत्सव, सण साजरे केले जातात. जेणेकरून विद्यार्थ्यांना आपल्या भारतीय संस्कृतीचे ज्ञान व्हावे, त्याचे महत्त्व मुलांना कळावे हा हेतू असतो. शिक्षिका आजगोलकर मॅडम व लोखंडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शारदीय नवरात्र उत्सव म्हणजे काय, हा का साजरा केला जातो, त्याचे काय महत्त्व आहे. घराघरांमध्ये देवीचा जागर का केला जातो. यासंदर्भात सविस्तर माहिती सांगितली. तसेच सर्व पालक वर्गाचेही मोलाचे सहकार्य लाभले. Dandiya at Unique Kids Pre School

युनिक किड्स परिवारातर्फे सर्वांना शिवलंगणाच्या म्हणजेच दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा दिल्या आहेत.
