गुहागर, ता. 04 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात (Khare-Dhere-Bhosle College) २ ऑक्टोबर २०२२ रोजी माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अॅड. मा.श्री.संकेत साळवी, सचिव श्री. निलेश गोयथळे, सहसचिव प्रा. जितेंद्र गद्रे आणि बहुसंख्य माजी विद्यार्थी व प्राध्यापकवृंद तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.श्री विराज महाजन. स्नेह मेळाव्याचे समन्वयक डॉ. बाळासाहेब लबडे उपस्थित होते. Alumni meet at KDB College

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान श्री लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर स्वागत समारंभ पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. बाळासाहेब लबडे यांनी केले. यावेळी कला आणि वाणिज्य शाखेतील माजी अनेक विद्यार्थी त्यांच्या निवडलेल्या क्षेत्रात उत्तुंग शिखरावर आहेत याचा महाविद्यालयाला सार्थ अभिमान आहे. अशा शब्दात त्यांनी माजी विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाबद्दल गौरव उद्गार काढले. Alumni meet at KDB College

प्रा.जी.बी.सानप यांनी NAAC (National Assessment and Accreditation Committee) प्रक्रियेतील माजी विद्यार्थ्यांची भूमिका यावर सविस्तर पीपीटीच्या आधारे भूमिका मांडली. त्यांनी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचे खूप चांगल्या प्रकारे प्लेसमेंट होत आहेत. महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत व याचे प्रमाण वाढत आहे असेही नमूद केले. Alumni meet at KDB College

प्रा. एन. एस. भालेराव यांनी विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला. यात सूक्ष्मजीवशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र आणि भूगर्भशास्त्र विषयातील विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रामध्ये अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. माजी विद्यार्थ्यांनी गुहागर येथे दि.१७ आणि १८ डिसेंबर २०१९ रोजी आयोजित केलेल्या “उधान” या सांस्कृतिक महोत्सवाचा उल्लेख केला. Alumni meet at KDB College

आपल्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.श्री विराज महाजन यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांना कनेक्ट, रिकनेक्ट आणि कंटिन्यू टू कनेक्ट हा तंत्र आणि मंत्र दिला. माजी विद्यार्थी संघटना कशी उदयास आली आणि सुरुवातीच्या काळात प्रत्येक घराघरात जाऊन माजी विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले हे सांगितले. त्याच प्रकारे महाविद्यालय हे सामाजिक, आर्थिक चळवळीचे केंद्र झाले पाहिजेत आणि हा धागा निरंतर चालत राहावा यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहायला हवे हेही सांगितले. माजी विद्यार्थी आणि महाविद्यालय यांच्यामध्ये नेहमी ॲक्शन आणि इंटरॅक्शन झाले पाहिजे त्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे असेही सांगितले. Alumni meet at KDB College

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनी आणि माजी विद्यार्थ्यांनी आपापला परिचय करून दिला. माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या अनुभव कथनामध्ये त्यांच्या महाविद्यालयीन काळातील आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ. रामेश्वर सोळंके व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. ऋषिकेश गोळेकर यांनी केले. Alumni meet at KDB College
