सरपंच पदावर सौ. समिक्षा बारगोडे ; गाव प्रमुखांची शिष्टाई यशस्वी
गुहागर, ता.04 : जाहिर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गुहागर तालुक्यातील वेळंब ग्रा. पं. अखेर बिनविरोध झाली आहे. ग्रामस्थांनी या निवडणुकीत दाखविलेला संयमीपणा व गाव प्रमुखांची यशखी शिष्टाई कामी येऊन निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे सरपंच पदासाठी सौ. समिक्षा स्वप्निल बारगोडे यांची निवड झाली आहे. Velamb Grampachayat election unopposed
ग्रा.पं. वेळंबच्या या सार्वत्रिक निवडणुकीत सर्व तीन प्रभागातले नऊ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. सुरुवातीला हि निवडणूक अटीतटीची होण्याची चिन्हे दिसत होती. परंतु गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन अनेक बैठका घेऊन सामंजस्य निर्माण केले व सर्व नऊ सदस्य बिनविरोध झाले. Velamb Grampachayat election unopposed
प्रभाग क्र. १ मधून वैष्णवी देवजी घाडे, श्वेता जयवंत घाडे व परशुराम घाडे, प्रभाग क्र. 2 मधून श्रीकांत मोरे, सौ. प्रगती संदिप माळी व प्रमोद राणे, प्रभाग क्र. ३ मधून सौ. प्रिया निलेश जाधव, सौ. जयश्री जाधव व श्री . सुरेश जाधव असे सर्व नऊ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. तर सरपंच पदासाठी एकूण तीन उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यामध्ये ग्रामस्थांनी सरपंच पदाची निवडणूक ही बिनविरोध करण्याचे सर्वांना आवाहन केले. त्यानुसार अर्ज दाखल केलेल्या तिघांपैकी दोन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे समिक्षा स्वप्निल बारगोडे या निवडून आल्या. Velamb Grampachayat election unopposed
वेळंब ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व कोणताही वाद न होता पार पडावी. यासाठी माजी लोक प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी प्रयत्न केले. Velamb Grampachayat election unopposed