• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाटपन्हाळे महाविद्यालयात विद्यार्थ्यांनसाठी प्रशिक्षण

by Mayuresh Patnakar
October 1, 2022
in Guhagar
16 0
0
Training at Patpanhale College
32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

ई-पिक पाहणी, आधारकार्ड व मतदान कार्ड जोडणीबाबत मोबाईल ॲप प्रशिक्षण

गुहागर, ता. 01  : सध्याचा काळ हा मोबाईलचा काळ आहे. महाविद्यालयातील बहुतांशी विद्यार्थ्यांकडे मोबाईल असतो. विविध संस्थांमध्ये प्रवेश घेणे, नावनोंदणी करणे, बॅकेचे व्यवहार करणे, वस्तूंची खरेदी करणे इत्यादी अनेक कामे मोबाईलच्या माध्यमातून केली जातात. याचबरोबर सध्या शासनाच्या विविध विभागांची व त्याव्दारे राबविल्या जात असलेल्या योजनांची माहिती देण्याचे व त्याची कार्यवाही करण्याचे सुद्धा मोबाईल मधील अनुप्रयोगाच्या (ॲप) (mobile application) माध्यमातून केले जात आहे. याबाबत विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी पाटपन्हाळे महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनसाठी ई-पिक पाहणी आणि आधारकार्ड व मतदान कार्ड जोडणी बाबत असलेल्या मोबाईल अनुप्रयोगाच्या (ॲप) प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन गुहागर तहसिलदार कार्यालयाच्या सहकार्याने पाटपन्हाळे महाविद्यालयात (Patpanhale College) करण्यात आले होते. Training at Patpanhale College

पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये मंगळवार दि. 20 सप्टेंबर 2022 रोजी प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी तहसिलदार मा. प्रतिभा वराळे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. यावेळी मा. प्रतिभा वराळे यांनी ई-पिक पाहणी आणि आधारकार्ड व मतदान कार्ड जोडणी  या उपक्रमांच्या उद्देशाबाबत माहिती सांगितली. तसेच विद्यार्थ्यांनी भविष्यात प्रगती करण्यासाठी योग्य मार्गाने वाटचाल करावी असे आवाहन केले. यावेळी प्रा. प्रसाद देसाई यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईलचा गैरवापर टाळावा. व अभ्यासाबरोबर सभोवतालच्या चांगल्या बाबी आत्मसात करुन आपली व  आपल्या कुटुंबियांची प्रगती साधावी असे सांगितले. श्री. आदलिंगे यांनी सदरची मोबाईल अनुप्रयोग (ॲप) कशी हाताळावी याची विद्यार्थ्यांनी माहिती सांगितली. Training at Patpanhale College

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व बहूसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रवीण सनये यांनी केले. Training at Patpanhale College

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarTraining at Patpanhale CollegeUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.