• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मामलेदार जोशींच्या देशप्रेमामुळेच वाचले सत्याग्रही

by Guhagar News
October 1, 2022
in Ratnagiri
16 1
0
Unveiling of Joshi's oil painting
32
SHARES
92
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संध्या साठे-जोशी ; लोटिस्मात तैलचित्राच्या अनावरणाने स्मृतीना उजाळा

गुहागर, ता. 01  : ब्रिटिशांच्या नोकरीत असतानाही सत्याग्रहींवर गोळीबार करायचा नाही,  असे आदेश देऊनही चिरनेर येथे जंगल सत्याग्रहावेळी तेव्हाचा पोलिस इन्स्पेक्टर पाटील याने गोळीबार केला. त्याला अडवताना मामलेदार केशव जोशी त्याच्या गोळीला बळी पडले. पण त्यामुळे शेकडो सत्याग्रहींचे प्राण वाचले. हे त्यांचे हौतात्म्य. देशप्रेमाचा हा आविष्कार एकाएकी आलेला नव्हता. ब्रिटिश चाकरीत असूनही त्यांचा पोशाख देशीच होता.  ते मामलेदार असताना त्यांच्या दोन्ही मुली सरकारविरोधी निदर्शनात सामील होत. त्यामुळे देशभक्ती अंतस्थ होतीच, असे प्रतिपादन संध्या साठे-जोशी यांनी केले. त्या केशव जोशी यांच्या तैलचित्राचे अनावरण कार्यक्रमात बोलत होत्या. Unveiling of Joshi’s oil painting

लोटिस्मामध्ये केशव जोशी हुतात्मा झाले. त्या २५ सप्टेंबर या दिवसाचे औचित्य साधून त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. जोशी हे मूळचे खानूचे. उद्योजक सुरेश बेहेरे यांच्या हस्ते आणि जोशी कुटुंबियांच्या उपस्थितीत अनावरण झाले. यावेळी बोलताना त्यांच्या नातसून संध्या म्हणाल्या की,  ते गेले तेव्हा माझे सासरे चार वर्षाचे होते. त्यांनाही वडील फारसे आठवत नव्हते. पण त्यांना मोठ्या बंधुंकडून, त्यांच्याकडून आम्हाला हा वारसा कळला. आजोबा ब्रिटिश सरकारच्या नोकरीतही धोतर सदरा कोट आणि डोक्याला रुमाल असा पारंपारिकच पोशाख होता. Unveiling of Joshi’s oil painting

25 सप्टेंबर 1930 साली चिरनेरला जो जंगल सत्याग्रह झाला. त्यादिवशी मामलेदार म्हणून त्यांचे तालुक्याच्या ठिकाणी ट्रेझरी व्हेरिफिकेशनचं काम होतं. ते पनवेललाही जाऊ शकले असते. तिकडे काय व्हायचं ते होऊ दे. आपण ट्रेझरी व्हेरिफिकेशनला जाऊया, असा विचार त्यांनी केला असता किंवा सत्याग्रहींना आवरण्यासाठी गोळीबाराची ऑर्डर दिली असती तर आठ ऐवजी ऐशी किंवा आठशे हुतात्मे झाले असते. चिरनेरच्या लोकांना आजही या गोष्टीची जाणीव आहे. Unveiling of Joshi’s oil painting

आजोबा केशव जोशी स्वतः सरकारी नोकर पण त्यांच्या दोन कन्या वेळोवेळी होणाऱ्या पिकेटिंग, प्रभात फेऱ्या यामधे  सामील असायच्या. वडील मामलेदार असतांना आणि मुलींनी सत्याग्रहात उतरणं हे त्यांच्या पाठिंब्याशिवाय शक्य नव्हतं. मातृभूमीच्या प्रेमाचा जिवंत झरा त्यांच्या अंतःकरणात सतत वाहत होता. पुतळ्याला विरोध ही खंतजे आदिवासी आणि कातकरी हुतात्मे झाले. त्यांचे पुतळे तेथे उभारले आहेत. आजोबा सरकारी नोकर होते म्हणून काही लोकांनी पुतळा बसवायला विरोध केला,  याची खंत वाटते. त्यांनी जेथे देह ठेवला तेथे त्यांचा पुतळा असावा, अशी आमची इच्छा भविष्यकाळात पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करते. रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव कलादालनात त्यांचे तैलचित्र लावले. त्याबद्दल लोकमान्य टिळक स्मारक वाचनमंदिराचे अन देशपांडे सरांचे जोशी कुटुंबियांच्या वतीने आभार मानले. Unveiling of Joshi’s oil painting

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUnveiling of Joshi's oil paintingUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.