2 ऑक्टोंबर, 2022 रोजी सकाळी 10 ते 4 पर्यंत
गुहागर, ता. 30 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात (Khare-Dhere-Bhosle College) 2 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10 ते 4 पर्यंत माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. माजी विद्यार्थी संघटनेच्या सहकार्यातून हा मेळावा घेण्यात आला आहे. 1992 पासून महाविद्यालय सुरू झाले. कला, वाणिज्य, विज्ञान व माहिती तंत्रज्ञान या विविध ज्ञान शाखांमधून हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले आणि ते आपापल्या क्षेत्रात यशवंत, गुणवंत व किर्तीवंत झाले. अशा सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव व्हावा व स्नेहबंध वाढावा. या हेतूने हा कार्यक्रम करण्यात येत आहे. Alumni get together at KDB college

यावेळी विद्यार्थ्यांचा गुणगौरव, अनुभव कथन, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन इत्यादी कार्यक्रम संपन्न होणार आहेत. तसेच माजी विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा मिळावा आणि महाविद्यालयासोबतचे ऋणानुबंध वृद्धिंगत व्हावेत. त्यांचा सल्ला वा मार्गदर्शन, महाविद्यालयाच्या पुढील वाटचालीत उपयोगी पडेल आणि इतर शैक्षणिक बाबींवर चर्चा करता येईल यासाठी हा मेळावा म्हणजे एक पर्वणी ठरणार आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती आहे. की, या कार्यक्रमात उपस्थित राहून मेळाव्याची शोभा वाढवावी, असे आवाहन महाविद्यालयातर्फे आपल्या सर्वांना करण्यात येत आहे. Alumni get together at KDB college
