• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

KDB महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन

by Mayuresh Patnakar
September 30, 2022
in Guhagar
19 0
0
National Service Day at KDB College

विद्यार्थांना-मार्गदर्शन-करताना-शिल्पा-बेहनजी

37
SHARES
105
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 30 : शनिवार दि. २४ सप्टेंबर रोजी खरे–ढेरे–भोसले महाविद्यालयात (Khare-Dhere-Bhosle College) राष्ट्रीय सेवा योजना दिन मोठा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी ब्रम्हकुमारी विद्यालयाच्या शिल्पा बेहनजी, सौ.निशा कांबळे, सोनाली वरंडे व त्यांच्या सहकारी, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य विराज महाजन उपस्थित होते. National Service Day at KDB College

प्रा. विराज महाजन यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचा इतिहास सांगितला. हा विभाग विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व घडविण्याचे काम करतो. विद्यार्थ्यांनी आपला “स्व” ओळखून या विभागामार्फत आपल्या स्वतःच्या कलागुणांना वाव द्यावा, असे आवाहन केले. National Service Day at KDB College

National Service Day at KDB College
राष्ट्रीय-सेवा-योजना-दिनानिमित्त-उपस्थित-विद्यार्थी-विद्यार्थिनी

शिल्पा बेहनजीनी मनोगतामध्ये स्वयंसेवकानी स्वतःला शक्तिशाली करणेचे गरजेचे आहे. जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक ठेवला पाहिजे. पुढे बोलताना “युथ” या शब्दाचे स्पष्टीकरण केले. “स्व” परिवर्तनातून विश्व परिवर्तन करण्याचे आवाहन त्यांनी स्वयंसेवकाना केले. जगाकडे बघताना आपण स्वतःला विसरतो याची जाणीव त्यांनी काही खेळ घेऊन करून दिली. National Service Day at KDB College

महिला सुरक्षा संघटनेच्या अध्यक्षा सौ.निशा कांबळे आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून त्या दिशेकडे वाटचाल करताना कितीही प्रतिकूल परिस्थिती आली. तरी शक्तिशाली मन व चांगले विचार हे त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी उपयुक्त ठरतात हे स्पष्ट केले. National Service Day at KDB College सोनाली वरंडे यांनी मुलींच्या स्वसंरक्षणासंदर्भात प्रात्यक्षिकासहित मार्गदर्शन केले. त्यासाठी विविध खेळ विद्यार्थिनींकडून करवून घेतले. तेजस तांबे हिने उपस्थित मान्यवर ,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे आभार मानले. यावेळी बहुसंख्येने स्वयंसेवक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे या राष्ट्रीय सेवा योजना दिनाचे सर्व नियोजन स्वतः विद्यार्थ्यांनी केले होते. National Service Day at KDB College

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNational Service Day at KDB CollegeNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share15SendTweet9
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.