गुहागर, ता. 29 : स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांचा 93 वा जन्म दिनी अयोध्येतील राम कथा पार्कामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या मृत्यूनंतरचा हा पहिला जन्मदिवस आहे. त्यामुळे त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी उत्तर प्रदेशातील अयोध्यामध्ये एका प्रमुख चौकामध्ये 14 टन वजनाची आणि 40 फुट उंचीची वीणा स्थापन करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय पर्यटन मंत्री उपस्थित होते. 40 feet high veena in Rambhumi

सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांची 93वी जयंतीनिमित्त राम कथा पार्कामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लता मंगेशकरांच्या आयुष्यावरील आधारित ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आले. याचं निमित्ताने महान संत महंत आणि जनप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले होते. 40 feet high veena in Rambhumi
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीं म्हणाले की, लता दीदीच्या जयंती निमित्त त्यांनी नमन. असं खूप काही आहे. जे मला आठवतंय. अगणित गप्पा ज्यामध्ये त्यांनी खूप प्रेम दाखवलं. मला आनंद आहे की अयोध्येमध्ये एक चौकाचे नाव त्यांच्या नावावरून ठेवलं जात आहे. संगीतात हा प्रभाव केवळ शब्द आणि गायनातून साधला जात नाही. भजन गाणाऱ्या व्यक्तीच्या मनात ती भावना, ती भक्ती, ते रामाशी असलेले तादात्म्य, ती नाती, तो रामाप्रति समर्पण भाव असेल तरच गाण्यात ती उत्कटता येत असते. लताजींनी म्हटलेल्या भजनामध्ये, केवळ त्यांचे गायनच नाही तर त्यांची श्रद्धा, अध्यात्म आणि पवित्रता प्रतिध्वनित होते. भारतातील एका महान, आदर्श व्यक्तिला भावपूर्ण श्रद्धांजली. 40 feet high veena in Rambhumi

