• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाटपन्हाळे हायस्कूलमध्ये माहिती अधिकार दिन साजरा

by Ganesh Dhanawade
September 29, 2022
in Guhagar
17 0
0
Right to Information Day in Patpanhale
34
SHARES
96
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

भ्रष्टाचाराचे समुळ उच्चाटन करणे गरजेचे ; सौ. नमिता वैद्य

गुहागर, ता.29 : देशामधील भ्रष्टाचाराचे समुळ उच्चाटन करण्यासाठी प्रत्येकाने कर्तव्यदक्ष असणे ही काळाची गरज आहे. भ्रष्टाचार होण्यास लाच स्वीकारणारा तसेच लाच देणारा दोघेही तितकेच कारणीभूत आहेत. आणि म्हणून भ्रष्टाचार होऊ नये. म्हणून प्रत्येकाने जाणीवपूर्वक काळजी घ्यावी, असे आवाहन न्यू इंग्लिश स्कूल पाटपन्हाळेच्या शिक्षिका सौ. नमिता वैद्य यांनी केले. माहिती अधिकार दिननिमित्त न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे येथे त्या बोलत होत्या. Right to Information Day in Patpanhale

गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे (Patpanhale College) येथे 28 सप्टेंबर रोजी माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सौ. वैद्य यांनी विद्यार्थ्यांना माहितीचा अधिकार म्हणजे नेमके काय याविषयी समजावून सांगितले. राईट टू इन्फॉर्मेशन म्हणजेच माहितीचा अधिकार हा शासन यंत्रणेतील व्यवहारांमध्ये पारदर्शकता यावी व भ्रष्टाचाराचे समोर निर्मूलन व्हावे. यासाठी अत्यंत आवश्यक आहे. जेष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे यांनी सलग नऊ वर्ष धरणे आंदोलन वेगवेगळ्या ठिकाणाचे दौरे संपूर्ण देशभरामध्ये जागृती करणे यासारख्या विविध मार्गाने झगडा देऊन सदर कायदा पास होण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. केंद्र सरकारने ऑक्टोबर 2005 मध्ये सर्व देशभरासाठी माहिती अधिकार कायदा लागू केला. प्रशासकीय कामांची कार्यपद्धती नियम समजून घेणे. त्यावर अभ्यासाअंती शासकीय कामांमध्ये गैरव्यवहार झाला. असे जनतेला वाटू शकते, तेव्हा विनाविलंब सहजगत्या त्याविषयी माहिती प्राप्त व्हावी यासाठी या कायद्याची निर्मिती करण्यात आली. Right to Information Day in Patpanhale

Right to Information Day in Patpanhale

महाराष्ट्रात भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या माध्यमातून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्यभर सभा घेतल्या जनजागृती अभियान दौरा चालवला उपोषण केले. या सर्व माध्यमातून हा कायदा लागू होण्यासाठी प्रयत्न केले. याचा फायदा आपण आजच्या पिढीने करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. या कायद्यामुळे प्रत्येक नागरिक वेगवेगळ्या खात्यांच्या प्रशासकीय विभागाच्या फाईलची माहिती घेऊ शकतो. आपल्या गावातील परिसरातील रस्त्यांची कामे, शासकीय बांधकामे यांची माहिती मिळवू शकतो. गावात, तालुक्यात, जिल्ह्यात शासकीय अन्य योजनांमध्ये धान्य पुरवठा, रॉकेल पुरवठा, गॅस पुरवठा यांच्या विषयी माहिती मिळवू शकतो. फक्त शासकीय कार्यालय नाही तर निमशासकीय कार्यालय, त्याचबरोबर सरकारी कामासाठी ज्या ज्या ठिकाणी सरकारी तिजोरीतील पैसा खर्च होतो, अशा कामांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून वापरलेल्या मालाचा दर्जा, कामाचा दर्जा याची तपासणी सुद्धा नागरिकांना करता येऊ शकते. Right to Information Day in Patpanhale

विशेष बाब म्हणजे या कायद्यान्वये सरकारी यंत्रणेबरोबरच शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था, सार्वजनिक बँका, स्वयंसेवी संस्था यांच्याकडील सर्व अभिलेखांवर विषयवार विभागणी करून त्याविषयीची माहिती सुद्धा उपलब्ध करून घेता येऊ शकते. एखाद्या अधिकाऱ्याने जाणून बुजून नागरिकांना माहिती देण्यास नकार दिल्यास त्याविषयी अपील सुद्धा करता येऊ शकते. १० रुपयांचा कोर्ट फी स्टँप अर्जावर लावून रोख रक्कम भरून कोणतीही माहिती मिळवता येवू शकते. म्हणून माहितीच्या अधिकाराचा योग्य तो वापर करून घेऊन आपल्या देशाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे हे प्रत्येक सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे. यातूनच आपल्या देशातील प्रत्येक घटकाची प्रगती होऊ शकते, असे त्यांनी सांगितले Right to Information Day in Patpanhale

मुख्याध्यापक श्री. थरकार यांनी गावपातळीपासून देशपातळीपर्यंत माहिती अधिकाराचा कोठे कसा वापर करता येईल, याची सविस्तर माहिती दिली. या अधिकाराचा कोणाला अडचणीत आणण्यास गैरवापर करू नये हे सुध्दा समजावून दिले. Right to Information Day in Patpanhale

यावेळी मुख्याध्यापक महावीर थरकार, सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख संपदा चव्हाण, व्याख्यात्या सौ. नमिता वैद्य, सौ. शर्मिला मोरे, सौ. सिया नांदलस्कर, अनुराधा चव्हाण, सौ. पूनम चव्हाण, श्री. सुरेश आंबेकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सौ. चव्हाण यांनी व आभार श्री. आंबेकर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. Right to Information Day in Patpanhale

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarRight to Information Day in PatpanhaleUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.