गुहागर, ता. 28 : तालुक्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजना, गुहागर आबलोली बीट क्र.२ च्या वतीने “राष्ट्रीय पोषण महिना” विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. आबलोली बीट क्र.२ च्या पर्यवेर्शिका सौ सृष्टी हळये मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी शीर खुर्द या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी विविध खाद्यपदार्थ प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन करून जनजागृती केली. National Nutrition Program of Aabaloli Beet

सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. अंगणवाडी सेविकांनी स्वागत गीतांने मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रमात आबलोली बीट अंतर्गत शीर, मासू, कोतळूक, पोमेंडी, पांगारी, गोणवली, पिंपर, जामसुत येथील अंगणवाडीतील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी सहभाग घेतला होता. National Nutrition Program of Aabaloli Beet

यावेळी बोलताना सौ. सृष्टी हळये सांगितले की, महिला व बालकांच्या आरोग्य व पोषण विषयक स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय पोषण महिना साजरा करण्यात येतो. त्याद्वारे समाजामध्ये जनजागृती घडवून आणण्याकरिता अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्याकडून प्रयत्न केले जातात. हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असतो. या अभियानामधुन मुलांना पुरक पोषण आहार देण्याबरोबरच पालकांमध्येही या आहाराबाबत जनजागृती करण्यात येत आहे. मातांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी, लहान मुलांना कुपोषणमुक्त, सुदृढ बनविण्यासाठी रोजच्या आहारात फळे आणि पालेभाज्यांचा समावेश असला पाहिजे. National Nutrition Program of Aabaloli Beet

या कार्यक्रमासाठी सरपंच श्री. विजय धोपट, ग्रामसेवक श्री. देवकाते डॉक्टर, आरोग्य सेविका सौ. नंदिनी कवडे, पर्यवेक्षिका सौ. सृष्टी हळये, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य, महिला पालक, बचत गट महिला, किशोरवयीन मुली, अंगणवाडी बालके उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका सौ लक्ष्मी बाळकृष्ण शिर्के यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व शीर मधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी सहकार्य लाभले. National Nutrition Program of Aabaloli Beet
