गुहागर, ता. 27 : निरनिराळ्या उपक्रमांमध्ये अग्रेसर असलेल्या रिगल कॉलेज (Regal College) शृंगारतळीमध्ये नवरात्रीनिमित्त बोंडला सजावट व थिम डेकोरेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नवरात्रीच्या प्रत्येक रंगानुसार विविध कोर्सेसच्या विद्यार्थ्यांनी आपली थिम ठरवलेली आहे. Various competitions in Regal College

सामाजिक जागरूकतेची जाणीव निर्माण होण्याकरिता विविध सामाजिक संदेश त्यांना आपल्या थिमद्वारे द्यायचा आहे. दि. २७ सप्टेंबर रोजी नवरात्रीच्या द्वितीय दिवशी लाल रंगाची सजावट रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्रथम वर्ष BCA(Bachelor of Computer Application) च्या विद्यार्थ्यांनी केली. त्यांनी Blood Donation हि थिम निवडली होती व त्यानुसार अत्यंत आकर्षक पद्धतीने बोंडला काढला व सेल्फी पाँइंट तसेच इतर सजावट केली. Various competitions in Regal College

आपल्या या थिमद्वारे त्यांनी रक्तदानाचे महत्त्व व आज काळाला त्याची किती गरज आहे हे पटवून दिले व “रक्तदान करा व जीवनदान द्या ” असे आवाहन केले. तरी रिगल कॉलेज शृंगारतळीतील विद्यार्थ्यांसाठी असे नवनवीन उपक्रम राबवीत असते. रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. संजयराव शिर्के, संचालिका डॉ. सुमिता शिर्के व रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ. रेश्मा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. Various competitions in Regal College
