गुहागर, ता. 27 : जगात धान्य, फळे, भाजी आणि अन्य प्रकारची शेती केली जाते. पण असा एक देश आहे की, तेथे चक्क विषारी सापांची शेती केली जाते. यावर विश्वास बसत नसला तरी हे खरे आहे. चीनमध्ये एक गाव आहे की, तेथे ही शेती केली जाते. या गावाचे नाव जिसिकियाओ असे आहे. Farming of venomous snakes

जिसिकियाओ गावात अत्यंत जहाल विषारी सापांची शेती केली जाते. येथे अनेक प्रकारचे 30 लाखांहून अधिक विषारी साप पाळले जातात. सुमारे एक हजार लोकसंख्या असलेल्या या गावातील प्रत्येक दुसरी व्यक्ती सापाच्या शेतीशी संबंधित आहे. या गावात पूर्वी चहा, ज्यूट, कापसाच्या शेतीबरोबरच मच्छीपालनाचा व्यवसाय केला जात असे. मात्र, गावकर्यांनी अन्य सर्व व्यवसाय बंद करून केवळ विषारी सापांची शेती करण्यावर भर दिला आहे. या शेतांमध्ये प्रत्येक प्रजातीचे विषारी साप आढळून येतात. Farming of venomous snakes

जिसिकियाओमध्ये किंग कोब्रा, अजगरपासून सुमारे 30 हजारांहून अधिक प्रकारच्या विषारी सापांचा व्यवहार केला जातो. या शेतीला ‘स्नेक फार्मिंग’ असेही म्हटले जाते. चीनमध्ये सापाच्या मांसाची मोठी मागणी असते. यामुळे ग्रामस्थ मोठ्या संख्येने साप विकून मोठी कमाई करतात. याशिवाय हे लोक सापांचे विष विकूनही पैसा कमवत असतात. या लोकांना फाईव्ह स्टेप नामक सापाची फार भीती वाटते. कारण या सापाच्या दंशानंतर संबंधिताचा अवघी पाच पावले चालण्यापूर्वीच मृत्यू होतो. Farming of venomous snakes
