स.पो.नि.प्रियांका जाधव बोर्ड विशेषज्ञ परीक्षेत देशात प्रथम
गुहागर, ता. 27 : पुणे पोलिस दलात सीआयडीमध्ये कर्तव्य बजावत असलेल्या सपोनि प्रियंका संकपाळ-जाधव यांनी अखिल भारतीय बोर्ड विशेषज्ञ परीक्षेमध्ये 250 पैकी 224 गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक मिळवत डंका वाजवला. मूळच्या त्या कोल्हापूरच्या असून सातारा तालुक्यातील धावली गावच्या सुनबाई आहेत. दरम्यान, तब्बल 20 वर्षांनंतर त्यांनी फिंगर प्रिंट विभागाची मानाची समजली जाणारी सर अजीज-उल-हक ट्रॉफी महाराष्ट्राला मिळवून दिली. Aziz-ul-Haq Trophy to Maharashtra

दिल्ली येथील नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो यांच्यावतीने ही परीक्षा घेण्यात आली होती. केंद्रीय परीक्षेत संकपाळ-जाधव या बहुमान मिळवणार्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. त्यांच्या या यशाबद्दल केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले. या परीक्षेत देशातील विविध राज्यातील एकूण 76 फिंगरप्रिंटचे अधिकारी सहभागी झाले होते. Aziz-ul-Haq Trophy to Maharashtra

ही परीक्षा लेखी, प्रात्यक्षिक व मुलाखत स्वरूपात घेण्यात आली होती. विशेष म्हणजे फिंगरप्रिंट विभागातील अत्यंत कठीण परीक्षेत त्यांनी हे यश मिळवले आहे. प्रियंका संकपाळ-जाधव या सध्या सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून सीआयडी पुणे येथे कार्यरत आहेत. सातार्यातील सुनबाईंनी देशात नाव उज्वल केल्याचे समोर आल्यानंतर धावली या गावी आनंद साजरा केला जात आहे. विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, पुरस्कार स्वीकारताना राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पोलिस अधीक्षक (आर्थिक गुन्हे शाखा) पंकज देशमुख, अंगुली मुद्रा केंद्र पोलिस अधीक्षक श्रीरंग टेकवडे उपस्थित होते. Aziz-ul-Haq Trophy to Maharashtra
