जिद्द व चिकाटीच्या जोरावर उद्योजक निर्मिती ; शाळीग्राम खातू
गुहागर, ता. 27 : धेय्य आणि मेहनतीमधून उद्योजक निर्माण होतो. यासाठी प्रचंड जिद्द असावी लागते. प्राप्त परिस्थितीला सामोरे जात नवनवीन अनुभवातून जो न थांबता त्याला सामोरे जातो तोच यशस्वी होतो, असे प्रतिपादन गुहागरातील खातू मसाले उद्योगचे प्रसिद्ध उद्योजक शाळीग्राम खातू यांनी केले. ते गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या पाटपन्हाळे कॉलेजच्या (Patpanhale College) वाणिज्य विभाग व लायन्सी क्लब गुहागरच्यावतीने विद्यार्थ्यांची मॉक इंटरव्ह्यु स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभात ते बोलत होते. Mock Interview in Patpanhale College

कॉलेजमधील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणानंतर नोकरीकरीता मुलाखतीला सामोरे जाताना मुलाखतीचे कौशल्य विकसित व्हावे, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली होती. खाजगी कंपनी, उद्योग, मार्केटींग, एलआयसी एजंट व बँकिंग क्षेत्रातच्या मुलाखतीच्या धर्तीवर ही स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये एकूण ४५ विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवीला. मुलाखत घेण्यासाठी उद्योजक शामकांत खातू, वरंडे विमा सेवा केंद्र प्रमुख संतोष वरंडे, बँक मॅनेजर यशवंत बर्वे, पत्रकार सत्यवान घाडे उपस्थित होते. दोन पॅनलद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याची दहा मिनिटापेक्षा अधिक काळ मुलाखत घेण्यात आली. मुलाखतीमधुन प्रत्येक पॅनलमधुन तीन क्रमांक काढण्यात आले. Mock Interview in Patpanhale College
एका पॅनलमधुन मंजूषा यशवंत गीजे हीने प्रथम क्रमांक पटकावला, द्वितीय ईश्वरी नितिन संसारे, तृतीय क्रमांक कोमल संजय झिंबर यांना देण्यात आला. दुसऱ्या पॅनलमधून प्रथम मृणाली सुचानंद देर्देकर, द्वितीय मयुरी यशवंत गीजे, तर तृतीय क्रमांक प्रणव मोहन ताणकर, स्वरांगी विलास नरळकर यांना विभागून देण्यात आला. प्रथम क्रमांकाकरीता रूपये ३००० व ट्रॉफी, द्वितीय क्रमांक रू. १५००, तृतीय क्रमांक रू. १००० तसेच सर्व विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. Mock Interview in Patpanhale College

प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्राध्यापक सुभाष खोत तर द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस लायन्स क्लब गुहागर तसेच संतोष वरंडे यांच्याकडून देण्यात आले. बक्षिस वितरण समारंभातून विद्यार्थ्यांच्या मुलाखतीचा लेखाजोखा संतोष वरंडे व शामकांत खातू यांनी मांडला. Mock Interview in Patpanhale College
यावेळी उद्योजक शाळीग्राम खातू, लायन्स क्लब गुहागरचे अध्यक्ष शामकांत खातू, लायन्स क्लब गुहागरचे सचिव संतोष वरंडे, प्राचार्य प्रमोद देसाई, लायन्स क्लबचे सदस्य ओंकार संसारे, उद्योजक विनोद पटेल, पत्रकार सत्यवान घाडे, प्रा. सुभाष खोत उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मृणाली देर्देकर तर आभार ईश्वरी संसारे हीने व्यक्त केले. Mock Interview in Patpanhale College
