• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
18 June 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चालण्याचे शरीरासाठी फायदे

by Mayuresh Patnakar
September 27, 2022
in Health
17 1
0
Benefits of walking for the body
34
SHARES
98
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, दि. 27 : रोज मॉर्निंग वॉकसाठी बाहेर जाणे तुम्हाला आवडते का? ह्याचे उत्तर हो असल्यास मी तुमचा मनापासून आभारी आहे. हे आश्चर्यकारक आहे, की चालण्यासारखा सोपा व्यायामदेखील तुमचा एकंदर फिटनेस राखू शकतो आणि तुमची तब्येत सुधारू शकतो. चालणे हा हृदय व रक्तावाहिन्यांच्या आरोग्यासाठी एक उत्कृष्ट व्यायाम मानला जातो. तुमच्या आरामशीर चालण्यात थोडासा बदल तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक फिट बनवेल आणि अधिक अंतर चालणे तुम्हाला खूप मदत करेल. पद्धतशीरपणे चालणे तुमचा एकंदर फिटनेस सुधारण्यास कशी मदत करेल ते समजून घेऊया. Benefits of walking for the body

1) हृदयाची तंदुरुस्ती आणि रक्तदाब कमी : 
तुम्हाला माहीत आहे का, हृदय एक स्नायू आहे आणि जेव्हा तुम्ही स्नायूंचा व्यायाम करता तेव्हा ते अधिक मजबूत होतात? जेव्हा तुम्ही बायसेप कर्ल करता, तेव्हा ते तुमचे बायसेप्स मजबूत बनवते आणि त्यामुळे बॅग किंवा जड काहीही सहजतेने उचलून नेण्यास मदत होते. त्याचप्रमाणे, तुम्ही हृदयासाठी व्यायाम करता तेव्हा ते मजबूत होते. मजबूत हृदय म्हणजे त्याला तुमच्या शरीराला रक्त पंप करण्यासाठी कमी प्रयत्न करावे लागतात. जितके कमी प्रयत्न तितकी कमी झीज. म्हणजे तुमच्या हृदयाचे वय त्याच्या व्यायामाने वाढू शकते आणि चालणे हा तुमच्या हृदयाचा व्यायाम करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. Benefits of walking for the body

2) स्नायूंची ताकद आणि सहनशक्ती सुधारते : 
चालणे शरीराचे जास्तीत जास्त स्नायू आणि सांधे यांना गुंतवून ठेवते, कारण हा संपूर्ण शरीराचे वजन उचलणारा व्यायाम आहे. हे सांधे, हाडे आणि शरीरातील बहुतेक स्नायू, विशेषत: पाय, पोटाचा भाग आणि हृदय यांचा फिटनेस सुधारते. Benefits of walking for the body

नियमित चालण्याचे बरेच फायदे आहेत, परंतु आपण प्रामुख्याने हृदयाच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करूयात, कारण बहुतेक अन्न आणि आपल्या दैनंदिन सवयींमुळे हृदयाच्या फिटनेसवर नकारात्मक परिणाम होतो. आपण हृदयाच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष करतो, कारण आपण ते पाहू शकत नाही. तुमच्या पायाला किंवा कोपराला दुखापत झाल्याची कल्पना करा, तरीही तुम्ही त्याकडे दुर्लक्ष कराल का? नाही. कारण तुम्ही ते पाहू शकता आणि ते तुम्हाला बरे करायचे असते. हृदय आपण आपल्या डोळ्यांनी बघू शकत नाही म्हणून ते दुर्लक्षित राहते. Benefits of walking for the body

चालण्यामुळे घाम येणे, झोपेची गुणवत्ता आणि पचन सुधारणे, वजन कमी होणे आणि तणावाचे व्यवस्थापन सुधारण्यास देखील मदत होते. पण चालणे ही एक साधी क्रिया आहे, असे वाटल्याने आपण त्याचे पालन करत नाही. माझ्यावर विश्वास ठेवा, नियमितपणे आणि वारंवार साध्या गोष्टी करण्यात मजा आहे. तर, उठा आणि फिरायला जा. Benefits of walking for the body

Tags: Benefits of walking for the bodyGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.