रत्नागिरीतून देखील चांगले अधिकारी तयार व्हावेत ; उदय सामंत
रत्नागिरी, ता.25 : मुंबई विद्यापीठाच्या चरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसरात स्पर्धा परिक्षा केंद्राचं उद्घाटन करण्यात आले. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ दिंगंबर शिर्के यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील त्याचबरोबर उपपरिसराचे प्रभारी संचालक डॉ.-किशोर सुखटणकर उपस्थित होते. Inaugural program at Mumbai University

यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, जिल्ह्यात चांगले अधिकारी तयार व्हावेत यासाठीच मुंबई विद्यापीठाच्या उपपरिसरात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोग आणि विशेषत: राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना या केंद्राचा चांगला उपयोग होईल. स्पर्धा परीक्षांची चळवळ ही गावागावात पोहोचावी यासाठी मुंबई विद्यापीठाचं हे केंद्र उपयुक्त ठरेल. असे सामंत आपल्या भाषणात म्हणाले. Inaugural program at Mumbai University
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के यांनी या केंद्रासाठी लागणारी जी काही मदत ती तातडीने देण्यात येईल, असे आपले अध्यक्षीय भाषणात त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठाचे सहकार्यही या स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी दिला जाईल, असे आश्वासनही शिर्के यांनी दिले. या कार्यक्रमाची प्रस्तावना करताना प्रभारी संचालक डॉ किशोर सुखठणकर हे केंद्र कशा पद्धतीने उभं राहिलं याची माहिती आपल्या प्रस्तावनावर भाषणात दिली. रत्नागिरी उपपरिसराचे प्रभारी कुलसचिव अभिनंदन बोरगावे यांनी या केंद्राची रचना कशी आहे आणि हे केंद्र पुढील काळात कशा पद्धतीने कार्य करेल याची माहिती देखील दिली. Inaugural program at Mumbai University

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री पावसकर हिने केलं तर आभार प्रदर्शन साक्षी चाळके हिने केलं. या कार्यक्रमाला रत्नागिरी परिसराचे प्राध्यापक वर्ग, कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. Inaugural program at Mumbai University
