गुहागर, ता. 23 : श्री देवी वराती देवस्थान व वराती देवी युवा मंडळ गुहागर खालचापाट यांच्यावतीने नवरात्रौत्सवानिमित्त 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. Navratri festival of Varati Devi


श्री देवी वराती नवरात्रौत्सवानिमित्त दि. 26 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वा. देवीची षोडशोपचार पूजा, सायं. 6.15 वा. मंदिर परिसरात बसविण्यात आलेल्या सीसीटिव्हीचे उदघाटन, 6.30 वा. अलंकार विखारे याने एलएलबी परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल गावाच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे. 7 वा. देवीची महाआरती, रात्रौ 9 वा. नूतन गोपाळ मंडळ गुहागर, बुवा दिनेश देवाळे यांचे सुश्राव्य भजन होणार आहे. दि. 27 रोजी सकाळी 6 वा. देवीची षोडशोपचार पूजा, सायंकाळी 7 वा. देवीची महाआरती, रात्रौ 9 वा. कांचन स्वामी नृत्य मंडळ असगोली हूंबरवाडी यांचे जाखडी नृत्य सादर होणार आहे. दि. 28 रोजी सकाळी 6 वा. देवीची षोडशोपचार पूजा, सायंकाळी 7 वा. देवीची महाआरती, दि. 29 रोजी सकाळी 6 वा. देवीची षोडशोपचार पूजा, सायं. 7 वा. देवीची महाआरती, रात्रौ 9 वा. शामसुंदर वराडकर मंडळ गुहागर खालचापाट यांचे नियमित वारीचे सुश्राव्य भजन, दि. 30 रोजी सकाळी 6 वा. देवीची षोडशोपचार पूजा, सायं. 7 वा. देवीची महाआरती, रात्रौ 9 वा. स्थानिक महिलांचे कार्यक्रम फनी गेम व गरबानृत्य कार्यक्रम होणार आहे. Navratri festival of Varati Devi


दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वा. देवीची षोडशोपचार पूजा, सायंकाळी 7 वा. देवीची महाआरती, रात्रौ 9 वा. श्री वराती देवी प्रासादिक मंडळ गुहागर खालचापाट यांचे नियमित वारीचे सुश्राव्य भजन दि. 2 रोजी सकाळी 6 वा. देवीची षोडशोपचार पूजा, सायं. 7 वा. देवीची महाआरती, रात्रौ 9 वा. स्थानिक लहान मुला- मुलींसाठी कार्यक्रम फनी गेम व गरबानृत्य, दि. 3 रोजी, सकाळी 6 वा. देवीची षोडशोपचार पूजा, सायं. 7 वा. देवीची महाआरती, रात्रौ 9 वा. श्री वक्रतुंड प्रासादिक मंडळ शिवणे ता. गुहागर बुवा संतोष पांचाळ यांचे सुश्राव्य भजन, दि. 4 रोजी स. 6 वा देवीची षोडशोपचार पूजा, सायं. 7 वा. देवीची महाआरती, रात्रौ 9.30 वा. शारदा देवी नृत्य कलापथक असगोली बुवा प्रमोद घुमे विरूध्द सोमेश्वर नृत्य पथक पश्चिम आग्रेवाडी मुंढर बुवा विनोद गावडे यांचा जाखडी नृत्याचा महामुकाबल (झगडा ) होणार आहे. दि. 5 रोजी सकाळी 6 वा. देवीची षोडशोपचार पूजा, सायं. 7 वा. देवीची दसरा महाआरती, रात्रौ 8.30 वा. देवीचा महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. Navratri festival of Varati Devi
तरी समस्त भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी वराती देवस्थान व वराती देवी युवा मंडळ गुहागर खालचापाट यांच्यावतीने करण्यात आले आहे. Navratri festival of Varati Devi